सोलापूर जिल्ह्यातील महा-ई सेवा, आपले सरकार सेवा, सीएससी केंद्रावर कार्यवाही झालीच पाहिजे – विनायक सावंत
सोलापूर (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्यातील विविध शासकीय सेवा पुरवणारी केंद्र, महा ई सेवा, आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी अशी अनेक सेवा केंद्रे यांचेमार्फत नागरिकांची होणारी आर्थिक लूट, नागरिकांना दिला जाणारा मानसिक त्रास व शासकीय नियमांचे उल्लंघन यावरती योग्य उपाययोजना करणेबाबत माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे तक्रारी अर्ज केला होता. या तक्रारीबाबत माननीय निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर यांनी तात्काळ सोलापूर जिल्ह्यातील सर्व माननीय उपविभागीय अधिकारी व सर्व माननीय तहसिलदार यांना कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्याचे आदेश दिले होते. परंतु वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाला सोलापूर जिल्ह्यातील एकही अधिकारी मानत नाहीत. त्यामुळेच अजूनपर्यंत कार्यवाही सोडूनच द्या, साधी चौकशीही केली नाही अशी परिस्थिती आहे.
सोलापूर जिल्ह्यातील एकाही माननीय उपविभागीय अधिकारी तसेच एकाही माननीय तहसिलदार यांनी कोणतीच कार्यवाही न केल्यामुळेच सेवा देणारे केंद्र चालक अजूनही जास्त प्रमाणातच मनमानी कारभार करु लागले आहेत. म्हणून माननीय निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर तसेच माननीय उपविभागीय अधिकारी व माननीय तहसिलदार यांना स्मरणपत्र देण्यात आले आहे. जर अजूनही या तक्रारी अनुसार कार्यवाही होणार नसेल तर, मग शेवटी माननीय मुख्यमंत्री साहेब यांना लिहिलेल्या पत्रातील लोकशाही आंदोलनाचा मार्ग अवलंबून आंदोलनाची दिशा निश्चित करुन या आंदोलनात कर्तव्यात कसूर करणारे माननीय अधिकारी यांच्यावरही शासकीय नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी ही भूमिका घेतली जाणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Поиск в гугле