लक्ष्मण हाके यांच्यावर गुन्हा दाखल करा, सकल मराठा समाज वेळापूर आक्रमक…

वेळापूर (बारामती झटका)
मराठा समाजातील मुलींच्या लग्नाबद्दल अपशब्द वापरल्यामुळे लक्ष्मण हाके यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी सकल मराठा समाज वेळापूर यांनी वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्याकडे तक्रारी अर्ज दिलेला आहे.

सकल मराठा समाज वेळापूर यांनी दिलेल्या तक्रारी अर्जामध्ये लक्ष्मण सोपान हाके यांनी बीड येथील सभेत मराठा समाजातील मुलींची लग्न आमच्या समाजातील मुलांसोबत लावा, असे वादग्रस्त वक्तव्य केलेले आहे. यामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे. तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असा तक्रारी अर्ज दिलेला असून वेळापूर येथील मराठा समाज बांधवांनी सह्या करून निवेदन दिलेले असून अनेक समाज बांधव उपस्थित होते…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



