Uncategorized

“स्पर्धा विश्व अभ्यासिकेचा” पोलीस भरतीचा यशस्वी निकाल

अकलुज (बारामती झटका)

नुकत्याच झालेल्या पोलीस भरती २०२३ मध्ये स्पर्धा विश्व अभ्यासिका मधून पोलीस पदी निकाल लागतच गुलालाची उधळण करत व फटाक्यांची आतीषबाजी करत आनंदोसत्व साजरा करण्यात आला. यामध्ये यशस्वी पोलीस भरतीसाठी निवड झालेले सचिन चोरमले (ठाणे शहर पोलीस), स्वप्नील भिसे (नवी मुंबई पोलीस), अमोल नरळे  (मुंबई शहर पोलीस), तात्या वाघमोडे (मुंबई शहर पोलीस), प्रीती मदने (मुंबई शहर पोलीस) यांची निवड झाल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

स्पर्धा विश्व अभ्यासिकेचे संचालक विनायक शिंदे सर यांनी देखील या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अभ्यासिकेमध्ये २०२० पासून संयुक्त पूर्व परीक्षा पास होणाऱ्या फी मध्ये ५०% सवलत दिली जाते व राज्यसेवा पूर्व परीक्षा पास होणाऱ्यांना अभ्यासिका मोफत उपलब्ध करून दिले जाते. याबरोबरच सहाव्या वर्धापनदिनापासून अनाथ मुले यांना मोफत अभ्यासिका व अपंग यांना ५०% फी मध्ये  सवलत देण्यात येत आहे. अशी सोय असणारी ही एकमेव अभ्यासिका आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button