फोंडशिरस येथे लाड उत्सव समस्त माळी समाज बांधवांच्या वतीने निकाली कुस्त्यांचे भव्य जंगी मैदान…

समस्त माळी समाज फोंडशिरस, महात्मा फुले समता परिषद फोंडशिरस, क्रांतीसुर्य प्रतिष्ठान फोंडशिरस यांच्यावतीने बाणलिंग आखाडा फोंडशिरस येथे भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
फोंडशिरस (बारामती झटका)
फोंडशिरस ता. माळशिरस, येथे लाड उत्सव सणानिमित्त समस्त माळी समाज बांधवांच्या वतीने भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन गुरुवार दि. २८/३/२०२४ रोजी दुपारी ४ वाजता बाणलिंग आखाडा, फोंडशिरस येथे करण्यात आले आहे. सदर कुस्ती मैदानाचे आयोजन समस्त माळी समाज फोंडशिरस, महात्मा फुले समता परिषद फोंडशिरस आणि क्रांतीसुर्य प्रतिष्ठान फोंडशिरस यांच्यावतीने करण्यात आले आहे.
सदर कुस्ती मैदानामध्ये पै. प्रकाश बनकर महाराष्ट्र केसरी गंगावेश तालीम कोल्हापूर विश्वास हरगुले यांचा पठ्ठा विरुद्ध हरियाणा केसरी पैलवान समरजीत सिंग यांच्यात लढत होणार आहे. पैलवान जमीर मुलाणी वस्ताद भालचंद्र पाटील यांचा पठ्ठा फोंडशिरस विरुद्ध पै. शुभम कोळेकर गंगावेश तालीम कोल्हापूर, विश्वास हरगुले यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे. तसेच पैलवान विशाल सोळंके विरुद्ध पैलवान सतीश खरात यांच्यात लढत होणार आहे. तर पै. दत्ता गोरे विरुद्ध पै. चंद्रहास नीगडे यांच्यात लढत होणार आहे.
सदर कुस्ती मैदानाचे समालोचन पैलवान हनुमंत शेंडगे सर व श्री. बापू कुंभार हे करणार आहे. तरी मल्ल सम्राट, वस्ताद, कुस्ती शोके यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. सदर मैदानाच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान विष्णू गोरे ९४२३३२८६४२, पैलवान प्रशांत शेंडे ९७६६३५५०७५, पैलवान दीपक गोरे ८३९०२६८८७४, पैलवान सागर शेंडे ९५०३२५१००१, पैलवान दिलीप पवार ७०३८४९८३३४, पैलवान संदीप बोराटे ९५२७५०९९३९, पैलवान कैलास गोरे ७५१७६९७६१७ यांच्याशी संपर्क साधावा.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.