स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या इशाऱ्याची महामार्ग प्रकल्प संचालकाने घेतली दखल दोन तासात अधिकारी घटनास्थळी दाखल..
पुणे पंढरपूर रोड निमगाव पाटी जवळ अकलूज कडे जाणाऱ्या रस्त्यावर भीषण अपघात झाला.
विझोरी ( बारामती झटका )
श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर माळशिरस तालुक्यातील निमगाव पाटी जवळ अकलूज रस्त्यावर चार चाकी व मोटरसायकल यांचा भीषण अपघात होऊन मोटरसायकल वरील दोन्ही व्यक्तींचे पायाला मोठ्या प्रमाणात लागलेले असून जोराची धडक बसल्यानंतर चार चाकी चालकाचा ताबा सुटलेला असून गाडी विरुद्ध दिशेला जाऊन अकलूज दिशादर्शक असणाऱ्या लोखंडी फलकावर जाऊन गाडी रस्त्याच्या कडेला साईट पट्टीवर उभी राहिलेली होती.
भीषण अपघात व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष आंदोलनविर अजितभैया बोरकर यांनी तातडीने महामार्गाचे प्रकल्प संचालक घोडके यांच्याशी तात्काळ संपर्क करून घटनेची संपूर्ण माहिती दिली अपघात कशामुळे होतो याची आपण वेळीच दखल घेऊन अपघात होणे थांबवा आणण्याचा आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या इशाऱ्याची प्रकल्प संचालक यांनी दखल घेऊन दोन तासात अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले होते पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरून अकलूज कडे जाणारा रस्ता तात्पुरता मुरूम टाकून बंद करण्यात आलेला आहे.
लोकांना जाण्या येण्याकरता ब्रिजचा वापर करावा भविष्यात सर्विस रस्ता मोठा करण्याचीही गरज असल्याचे सांगितले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिलेदार माणसातील देव माणूस डॉक्टर सचिन शेंडगे उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यतत्पर भूमिकेबद्दल स्थानिक नागरिक व प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
सकाळी घडलेली हकीकत अशी
विठ्ठलवाडी येथील तीन मोटरसायकल वरून अकलूज कडे लोक निघालेले होते निमगाव पाटी पास करून अकलूज कडे वळणार होते त्यापैकी एक नंबर गाडी अकलूज कडे वळालेली होती दुसऱ्या नंबरची मोटर सायकल वळत असताना पंढरपूरकडून येणाऱ्या चार चाकी गाडीचा आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाला त्यांच्याच पैकी पाठीमागे असणाऱ्या मोटरसायकल वरील लोकांच्या व आसपासच्या लोकांना भीषण अपघात डोळ्यासमोर होताना पाहायला मिळाला.
मोटर सायकल जिथून अकलूज कडे वळणार होती त्याच ठिकाणी चार चाकी गाडीची जोरदार धडक दिल्याने मोटरसायकल वरील दोन व्यक्ती व मोटरसायकल रस्त्यावर पडली तर धडकेनंतर चार चाकी गाडी दुसऱ्या बाजूकडे जाऊन अकलूज दिशादर्शक फलकाला धडकलेली आहे मोटरसायकल अपघात व्यक्ती जबरदस्त धक्का असल्याने बेशुद्ध अवस्थेत होत्या अपघात व्यक्तींचे नातेवाईक उपस्थित असल्याने अकलूज येथील दवाखान्यात पुढील उपचारासाठी घेऊन गेलेले आहेत.
पुणे पंढरपूर पालखी महामार्ग झाल्यानंतर अनेक ठिकाणी रस्ते मृत्यूचे सापळे बनलेले आहेत त्यापैकी निमगाव पाटी जवळील अकलूज कडे वळणारा रस्ता मृत्यूचा सापळा करत आहे पंढरपूर कडून पुणे कडे जाणारे वाहन येत असताना वेगाची मर्यादा वाढलेली असते अकलूज कडे वळणाऱ्या मोटरसायकल व इतर वाहनांचे पंढरपूर कडून येणाऱ्या वाहनांना वळणार आहेत की नाही याची कल्पना नसते त्यामुळे अचानक वाहन वळाल्यानंतर जोरात येणाऱ्या वाहनांची कसरत होते काही वेळेला अपघाताला सामोरे जावे लागते यासाठी महामार्गावरील अधिकारी यांनी वेळीच उपाय करावे अशी सर्वसामान्य जनतेची मागणी होती या मागणीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आंदोलन वीर अजित भैया बोरकर यांनी महामार्गाचे प्रकल्प संचालक घोडके यांच्याशी संपर्क साधून पुढील होणारे वाहनाचे अनर्थ टाळलेले आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Very well-written and funny! For more details, click here: EXPLORE NOW. Looking forward to everyone’s opinions!