Uncategorizedकृषिवार्तातंत्रज्ञानशैक्षणिक

माढा लोकसभेच्या अध्यक्षांच्या निवासस्थानी नूतन संचालक बाळासाहेब माने देशमुख व अनिकेत माने देशमुख यांचा सन्मान

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी बाळासाहेब माने देशमुख व महाराष्ट्र लोकसेवा परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेला अनिकेत माने देशमुख यांचा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान संपन्न

वेळापूर (बारामती झटका)

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी बाळासाहेब माने देशमुख व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून शेतकऱ्याच्या मुलाने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल अनिकेत माने देशमुख या दोघांचा सन्मान माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकर तात्या माने देशमुख यांच्या निवासस्थानी वेळापूर, ता. माळशिरस येथे मारुतीराव माने देशमुख, दौलतराव माने देशमुख, नामदेव माने देशमुख या ज्येष्ठांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी सत्काराला उत्तर देताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन संचालक बाळासाहेब देशमुख म्हणाले, आपण सर्वजण खंबीरपणे माझ्या पाठीशी असल्यामुळे मी संचालक झालो. माझे संचालक पद सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी असेल. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात प्रथम आलेल्या अनिकेत माने देशमुख याच्या सन्मानाने घरातील भारावून जाऊन घरातील जेष्ठांची कौतुकाची थाप मला नेहमीच भविष्यात प्रेरणादायी राहील असे ते म्हणाले.

या सत्कार समारंभ प्रसंगी महादेव देवालय ट्रस्ट वेळापूरचे अध्यक्ष अमृतराज माने देशमुख, धनंजय माने देशमुख, श्रीकृष्ण माने देशमुख, सिद्धेश्वर माने देशमुख, विराज माने देशमुख, तानाजी माने देशमुख, एकनाथ माने देशमुख, सुधीर माने देशमुख, धैर्यशील माने देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वेळापूर शहराध्यक्ष सचिनदादा पवार, भारत माने देशमुख, आकाश माने देशमुख, पप्पू निंबाळकर, सचिन माने देशमुख, दीपक माने देशमुख, बंडूकाका माने देशमुख, हर्षद माने देशमुख, जयदीप माने देशमुख, राजदीप माने देशमुख, यशराज माने देशमुख, मेघराज माने देशमुख आदींसह सर्वमान्य देशमुख परिवाराच्यावतीने भव्यदिव्य असा सन्मान करण्यात आला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button