Uncategorized

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा होणार…

विझोरी (बारामती झटका)

विझोरी गावचे थोर सुपुत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस विधानसभा अध्यक्ष व पिसेवाडी ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत सदस्य साहिल आतार व माणसातील देव माणूस अष्टविनायक हॉस्पिटलचे डॉ. सचिन शेंडगे यांनी विविध उपक्रमाचे आयोजन केलेले आहे.

गुरुवार दि. 01/06/2023 रोजी सकाळी 11 वाजता गोपाळपूर, ता. पंढरपूर येथे गोरगरीब व दिनदुबळ्या अनाथांना मिष्ठान्न भोजन देण्याचे प्रयोजन आहे. दुपारी 02 वाजता श्रीनाथ विद्यालय तरंगफळ येथे पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता वृक्षारोपण कार्यक्रम होणार आहे.

शुक्रवार दि. 02/06/2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विझोरी येथे शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व खाऊ वाटप होणार आहे. सायंकाळी 05 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संपर्क कार्यालय विझोरी निमगाव पाटी येथे निराधार महिलांना साडी वाटप करण्यात येणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आंदोलन वीर अजितभैया बोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचा भरगच्च कार्यक्रम साहिल आतार व डॉ. सचिन शेंडगे यांनी घेतलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button