Uncategorizedताज्या बातम्या

मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारीपदी राजेंद्र भोसले यांची नियुक्ती

पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई (बारामती झटका)

मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची मंगळवारी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर चौधरी यांची मुंबईत विक्रीकर विभागाच्या सह आयुक्तपदी बदली झाली आहे. सिद्धराम सालीमठ हे अहमदनगरचे नवे जिल्हाधिकारी असणार आहेत.

राज्य सरकारने मंगळवारी भारतीय प्रशासकीय सेवेतील पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील आदेश जारी केले आहेत. त्यानुसार २००८ च्या तुकडीचे अधिकारी राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगर जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.

सिडको, औरंगाबादच्या मुख्य प्रशासक (नवी वसाहत) दीपा मुधोळ मुंडे यांची बीड जिल्हाधिकारी पदी तर बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची सिडको, औरंगाबादच्या मुख्य प्रशासक (नवी वसाहत) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच २०११ च्या तुकडीचे अधिकारी सिद्धराम सालीमठ यांची अहमदनगर जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button