स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.
वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यांच्या शुभहस्ते कार्यक्रम संपन्न झाला.
वेळापूर (बारामती झटका)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी साहेब व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तानाजीकाका बागल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आंदोलन वीर अजितभैया बोरकर यांच्या नेतृत्वाखाली पिसेवाडी ग्रामपंचायत सदस्य व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधानसभा अध्यक्ष साहिल आतार यांनी शालेय विद्यार्थ्यांना संघटनेच्या वतीने 200 स्कूल बॅगचे वाटप वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यांच्या शुभहस्ते बुधवार दि. 21 जून 2023 रोजी वाटप करण्यात आले.
यावेळी फलटण-लोणंद रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथअण्णा वाघमोडे, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर सुळ पाटील, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा संघटक शहाजहान शेख, पिसेवाडीचे थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच मोहनराव भाकरे, सदस्य नागेश जानकर, तात्यासाहेब काळे, स्वाभिमानीचे कट्टर शिलेदार माणसातील देव डॉ. सचिन शेंडगे, शैलेश भाकरे, दादा म्हेत्रे, सुधीर शेंडे, शिवाजी वाघमारे, तेजस भाकरे, सोमनाथ भागव, अजय पिसे, शिवराम गायकवाड, अजित कोडक, सिराज तांबोळी, दादा काळे, समाधान काळे, अहिर पठाण, अमरसिंह माने देशमुख, गोपाळराव घाडगे, माधव वाघमारे, अभिजीत गवळी, मैनुद्दीन आतार, भैय्या धोत्रे, ईलाई आतार, मुसा आतार, इकबाल आतार आदींसह गावातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे पालक, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळोवेळी आंदोलने, उपोषणे, रास्ता रोको करून सर्वसामान्य जनतेला व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम अजित बोरकर यांनी केलेले आहे. त्यांना स्वाभिमानीचे सर्व शिलेदार साथ देत आहेत. साहिल आतार यांनी जोमाने काम केलेले असल्याने गावातील लोकांनी ग्रामपंचायतीमध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे. दिलेल्या संधीचे सोने करण्याचे काम साहिल आतार यांचे सुरू आहे. अतिशय स्तुत्य उपक्रम घेऊन गोरगरीब व सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना शालेय स्कूल बॅग देऊन सामाजिक कार्याची जपणूक केलेली आहे. भविष्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताकद देऊन जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सभागृहात संघटनेचे कार्यकर्ते कसे जातील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्याचे कौतुक केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This article was a fantastic blend of information and insight. It really got me thinking. I’m looking forward to hearing what others think. Check out my profile for more engaging discussions.