मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिनी माळशिरस तालुक्यात वृक्षारोपण व महारक्तदान मोहिमेची कार्यकर्त्यांनी चळवळ उभी केली..

माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील 110 गावात वृक्षारोपण व एकाच ठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन..
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि. 21/07/2025 रोजी माळशिरस तालुक्यातील 110 गावांमध्ये शाळा व सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. मंगळवार दि. 22/07/2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 05 वाजेपर्यंत महाराष्ट्र दान संकल्पनेतून विक्रमी संख्येने भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केलेले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिनी माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यात वृक्षारोपण व महा रक्तदान मोहिमेची कार्यकर्त्यांनी चळवळ उभा करून माळशिरस तालुक्यात विक्रम केलेला आहे…

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक वृक्ष एक भविष्य’ या हरित महाराष्ट्राच्या संकल्पासह ‘चला वृक्षारोपण करूया’ अंतर्गत पर्यावरणाचा समतोल राखून सामाजिक जाणीव ठेवून वृक्षारोपण काळाची गरज आहे असा उदात्त हेतू ठेवून माळशिरस तालुक्यात एकही गाव व वाडी वस्ती वृक्षारोपण करण्याचे राहिलेली नाही, असे नियोजन माजी आमदार राम सातपुते यांनी भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांकडून करून घेतलेले आहे. जिल्हा परिषद शाळा व शासकीय जागेवर वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखलेला आहे. लहान मुलांच्या मनामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्याविषयी आत्मीयता व प्रेम करावे, यासाठी शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व शालेय साहित्य यांचे वाटप करण्यात आलेले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे राजकारण जसे बहरत जाणार आहे, तसेच माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावात व वाडीवस्तीवर जन्मदिनी वृक्षारोपण केलेले रोपटे सुद्धा जोमाने व डौलाने वाढत राहणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या जन्मदिनी महारक्तदान शिबिराचे आयोजन नातेपुते येथील राजे वैभव मंगल कार्यालयामध्ये करण्यात आलेले होते. सकाळी 10 वाजता रक्तदान शिबिराचा शुभारंभ भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून रक्तदानाला सुरुवात करण्यात आली. रक्तदानाची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 04 होती. मात्र सायंकाळी 05 वाजेपर्यंत रक्तदान सुरू होते. सोलापूर येथील ब्लड बँक यांच्या 25 बेड व नातेपुते ब्लड बँकेच्या 10 बेड होत्या. रक्तदात्यांच्या रक्तदान करण्याकरता रांगा लागलेल्या होत्या.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एकमेव मुख्यमंत्री ठरलेले आहेत. माजी आमदार राम सातपुते यांच्या संकल्पनेतून माळशिरस तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 110 गावात वाड्यावस्त्यावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेऊन जिल्हा परिषद शाळेतील लहान मुलांना खाऊ वाटप व शालेय साहित्य वाटप केलेले आहे.

नातेपुते येथील रक्तदान शिबिरासाठी माळशिरस तालुक्यातील एक कुटुंब एक कार्यकर्ता अशा पद्धतीने रक्तदानासाठी निष्ठावान कार्यकर्त्यांनी रक्तदान स्वयंस्फूर्तीने केलेले आहे. माजी आमदार राम सातपुते यांनी रक्तदानासाठी रक्तदात्यांना आवाहन केलेले होते. अनेक ठिकाणी आपण पाहतो रक्तदानाचे आयोजन करणारे रक्तदान करीत नाहीत लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, असे समाजामध्ये पाहत असतो मात्र, माजी आमदार राम सातपुते यांनी स्वतः रक्तदान करून समाजामध्ये नेत्यांची निष्ठा काय असते, असा वेगळा संदेश निर्माण केलेला आहे. महिलांनी सुद्धा रक्तदानामध्ये सहभाग नोंदविलेला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिनी माळशिरस तालुक्यात वृक्षारोपण व महा रक्तदान मोहिमेची माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली निष्ठावान कार्यकर्त्यांनी चळवळ उभी करून माळशिरस तालुक्याच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना अनोखी भेट वाढदिवसाला दिलेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



