स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शिका सौ. राधाबाई बोरकर खंडाळी गणातून तर विधानसभा अध्यक्ष साहिल आतार खुडूस गणातून निवडणूक लढणार.
अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस पंचायत समिती निवडणुकीसाठी गट व गण रचना जाहीर झालेली होती. आज उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, तहसीलदार जगदीश निंबाळकर, नायब तहसीलदार तुषार देशमुख, गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांच्या उपस्थितीमध्ये पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झालेले आहे. खंडाळी पंचायत समिती गण साधारण महिलेसाठी आरक्षित झालेला आहे. सदर गणामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यक्षम अध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांच्या मातोश्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शिका सौ. राधाबाई भरत बोरकर पंचायत समिती गणातून उभ्या राहणार आहेत तर, खुडूस पंचायत समिती गणामध्ये पिसेवाडी गावचे युवानेते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस विधानसभा अध्यक्ष साहिल आतार हे उभे राहणार आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष तानाजीकाका बागल यांच्या नेतृत्वामध्ये माळशिरस तालुक्यात आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांनी शेतकरी बांधव व सर्वसामान्य जनता यांच्यासाठी वेळोवेळी मदत करून वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलने मोर्चे केलेले आहेत. माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य जनता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यावरती समाधानी आहे. शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जनतेचा व मतदारांचा वाढता पाठिंबा आहे. पंचायत समिती खंडाळी गण सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव झालेला आहे. त्यामध्ये खंडाळी, पानीव, विजयवाडी, विझोरी, माळेवाडी ( बोरगाव ) या गावांचा समावेश आहे. खुडूस पंचायत समिती गण सर्वसाधारणसाठी आरक्षित झालेला आहे. सदर गणामध्ये खुडूस, निकमवाडी, डोंबाळवाडी, पिसेवाडी या गावांचा समावेश आहे.
खुडूस व खंडाळी गण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला समजला जातो. माळशिरस तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जाळे विणलेले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना वेळ पडल्यास स्वबळावर लढणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष आंदोलन वीर अजित भैया बोरकर यांनी आरक्षणानंतर पहिली प्रतिक्रिया देताना सांगितले. माळशिरस तालुक्यामध्ये जर कोणत्या गटाने किंवा पक्षाने समाविष्ट केले तर त्यांच्यासोबत निवडणूक लढणार. जागा वाटपामध्ये बोलणी फिस्कटल्यानंतर स्वबळावर लढण्याची तयारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिलेदारांची असल्याचे मत अजित भैया बोरकर यांनी सांगून माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेऊन नावे जाहीर करणार आहे. तत्पूर्वी खंडाळी पंचायत समिती गणातून राधाबाई भरत बोरकर व खुडूस पंचायत समिती गणातून साहिल आतार यांची नावे जाहीर केलेली आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Fantastic perspective! I found myself nodding along. For additional info, click here: LEARN MORE. What’s everyone’s take?