स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत युवानेते विकासभैय्या घुले यांचा जाहीर प्रवेश.
पानीव गावचे युवा नेते व अहिल्या प्रतिष्ठान जयंती महोत्सव समिती अकलूजचे अध्यक्ष विकासभैय्या घुले यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जाहीर प्रवेश.
जयसिंगपूर ( बारामती झटका )
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा शेतकऱ्यांचे दैवत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत माळशिरस तालुक्यातील
पानीव गावचे युवा नेते व अहिल्या प्रतिष्ठान जयंती महोत्सव समिती अकलूजचे अध्यक्ष विकास (भैय्या) घुले यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये जाहीर प्रवेश जयसिंगपूर येथील संपर्क कार्यालयात झाला.
यावेळी प्रमुख उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजित (भैय्या) बोरकर यांच्यासह जेष्ठनेते मगन काळे, गणपत काळे, विधानसभा प्रमुख साहिल आतार, समाधान काळे, आहिल पठाण, विठ्ठल जाधव, पृथ्वीराज देशमुख, उत्कर्ष चौगुले आदि स्वाभिमानी संघटनेचे शिलेदार उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यामध्ये विकासभैय्या घुले यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांचा सामाजिक कार्यात नेहमी सहभाग असतो. त्यांच्याकडे युवकांचे संघटन मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे भविष्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बळकटी मिळणार आहे. माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या गोटामध्ये विकासभैय्या घुले यांच्या प्रवेशाने आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng