स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चळवळीतील शिलेदारांना श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर संचालक पदाची संधी.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी व चळवळीतील मशाल रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले तानाजीकाका बागल व सचिन पाटील यांना संधी मिळाली.
पंढरपूर ( बारामती झटका)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी व शेतकरी संघटनेच्या चळवळीतील धगधगती मशाल रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली चळवळीमध्ये जनतेच्या व शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चळवळीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजीकाका बागल व स्वाभिमानी शेतकरी संघटना पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन पाटील या दोन शिलेदारांना श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड गुरसाळे तालुका पंढरपूर या कारखान्यावर तज्ञ संचालक म्हणून काम करण्याची संधी कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील व त्यांच्या सर्व संचालक मंडळाने काम करण्याची संधी दिलेली आहे, याचा फायदा सर्व शेतकरी, सभासद व कामगार बांधव यांच्या हितासाठी होणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जोमाने काम तानाजीकाका बागल व सचिन पाटील यांनी सहकाऱ्यांच्या सहकार्याने काम करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केलेले आहे. चळवळीच्या माध्यमातून जोड गोळीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांचे विचार तळागाळात पोचवण्याचे काम केलेले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर सभासद व कामगार यांच्यासाठी वेळोवेळी आंदोलने निवेदने देऊन सभासद व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिलेले आहेत. अशा चळवळीमधील शिलेदारांना कारखान्यांमध्ये तज्ञ संचालक पदावर काम करण्याची संधी मिळालेली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर व सर्व पदाधिकारी यांनी नूतन संचालक तानाजीकाका बागल व सचिन पाटील यांचा सन्मान बुधवार दि. १ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १ वा. निमगाव पाटी विझोरी येथे संपन्न होणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng