स्व. ह.भ.प. रामचंद्र साठे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भजन व पुष्पवृष्टीचे आयोजन
भोर (बारामती झटका)
माझ्या वडिलाची मिरासी गा देवा ।
तुझी चरणसेवा पांडुरंगा ।।
भोर पुणे येथील स्व. ह. भ. प. रामचंद्र बाबुराव साठे (दादा) यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त दि. १५/०४/२०२३ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत भजन कार्यक्रम व विधीवत पुष्पवृष्टीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नातेवाईक, मित्रपरिवार आणि आप्तेष्ट यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन प्रा. श्री. मार्तंड रामचंद्र साठे (सर) (शिव-मल्हार गड, भोर, पुणे), श्री. सुभाष रामचंद्र साठे (सरपंच ग्रा. पं. निमगाव आणि उपाध्यक्ष राम कृष्ण हरी वारकरी संघटना, माळशिरस तालुका), श्री. किशोर रामचंद्र साठे (कॅप्टन – भारतीय सेना), श्री. बाळासाहेब रामचंद्र साठे, श्री. संदीपान रामचंद्र साठे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
पितृत्वाची गेली सावली,
करुणेचा सागर हरपला।
नावातच तुमच्या राम पाहिला,
हृदयातून कृष्ण-हरी।।
निरक्षर असूनही वाचली गाथा-ज्ञानेश्वरी,
एकनाथ-नामदेव-तुकाराम अभंगवाणी।
बघता बघता दादा ४ वर्षे लोटली,
आमच्या वाट्याला पुण्यस्मरण आठवणी।।
हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त साठे परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Si está pensando en usar una aplicación para espiar teléfonos celulares, entonces ha tomado la decisión correcta.