‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ कार्यक्रम सर्वांनी सामील होऊन उत्साहात साजरा करावा – नूतन भाजपा तालुका उपाध्यक्ष महादेव केसकर
डोंबाळवाडी (बारामती झटका)
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या तीन दिवशी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला डोंबाळवाडीतील प्रत्येक नागरिकांनी आमलात आणावे, असे डोंबाळवाडीतील नूतन भाजपा तालुका उपाध्यक्ष महादेव केसकर यांनी डोंबाळवाडीतील व पंचक्रोशीतील नागरिकांना श्रीनाथ मंदिराच्या समोर ग्रामस्थांतर्फे आयोजित केलेल्या सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना केसकर म्हणाले कि, जगातील सर्वात मोठा जनाधार असलेल्या भाजपाच्या तालुका उपाध्यक्षपदी पक्षश्रेष्ठींनी केलेल्या निवडीबद्दल सर्वश्रेष्ठींचे आभार मानले. व इथून पुढे पश्चिम भागात पक्ष वाढीसाठी व लोकांच्या कल्याणासाठी पूर्ण वेळ देऊन कार्य करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्याचे नेते आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील, ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील तसेच कार्यसम्राट आमदार राम सातपुते, के.के. पाटील, बाळासाहेब सरगर, संजय देशमुख, बाजीराव काटकर, हनुमंत सूळ, दत्तात्रय शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचे सत्काराला उत्तर देताना केसकर यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रत्येक कुटुंब प्रमुखाला भाजपच्या वतीने तिरंगी झेंड्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीअमोल रुपनवर, हनुमानवाडीचे सरपंच विनोद दुबे, शिवाजी धायगुडे, अमोल माने, ज्ञानदेव महारनवर, रवी महारनवर, नितीन महारनवर, अमोल मोरे, नागेश सुळ, नाना धायगुडे, बबन रुपनवर, ज्ञानदेव रुपनवर, अण्णा डोंबाळे, वैभव रुपनवर, राधेश्याम गोसावी, प्रकाश सोनवलकर, दया महानवर, आत्माराम रुपनवर, विघ्नहर माने, सतीश सुळ, तात्या चोरमले, मामा खरात, लक्ष्मण करे, विजय घाडगे, विनोद वायसे आदींनी परिश्रम घेतले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng