ह.भ.प. अमोल सुळ महाराज मोरोची यांचे सुश्राव्य किर्तन भांबुर्डी येथे होणार
स्व. लक्ष्मीबाई वाघमोडे यांचे प्रथम पुण्यस्मरण व स्वर्गीय रामचंद्र वाघमोडे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन
भांबुर्डी ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती गणपततात्या वाघमोडे यांच्या मातोश्री स्व. लक्ष्मीबाई बापुराव वाघमोडे यांचे प्रथम पुण्यस्मरण व बंधू माळशिरस तालुका रेशन धान्य दुकान संघटनेचे अध्यक्ष स्व. रामचंद्र बापूराव वाघमोडे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवार दि. 22/07/2022 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. अमोल सुळ महाराज मोरोची यांचे सुश्राव्य कीर्तन भांबुर्डी चाहूर वस्ती येथे होणार आहे.
कीर्तनानंतर प्रतिमांवर पुष्पवृष्टी करून आरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी मित्र परिवार व नातेवाईक यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे श्री. गणपतराव बापूराव वाघमोडे, श्री. तानाजी बापूराव वाघमोडे, श्री. पांडुरंग बापूराव वाघमोडे, श्री. नितीन रामचंद्र वाघमोडे व समस्त वाघमोडे परिवार यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great write-up! Your analysis is spot-on. For those wanting to explore more, this link is helpful: FIND OUT MORE. What are your thoughts?
Xin chào, tôi muốn biết giá của bạn.