ह.भ.प. रखमाजी बुवा भालेराव समाज प्रबोधन पुरस्कार समिती सोलापूर यांच्यावतीने समाज जागृती पुरस्कार वितरण
सोलापूर (बारामती झटका)
ह.भ.प. रखमाजी बुवा भालेराव समाज प्रबोधन पुरस्कार समिती सोलापूर यांच्यावतीने शिक्षण, आरोग्य, कला, क्रीडा, विकास, संस्कृती, समाजकारण, पर्यावरण, महिला सबलीकरण आदी परीघात उल्लेखनीय रचनात्मक कार्य करत असलेल्या व्यक्तीचा ह.भ.प. रखमाजी बुवा भालेराव समाज प्रबोधन पुरस्कार देवून व ह.भ.प. बब्रुवान महाराज भालेराव समाज जागृती पुरस्कार संस्थाना देवून सन्मानित करण्यात येणार आहे. प्राचार्य डॉ. रवीराज फुरडे, महादेवराव कांबळे, कवी फुलचंद नागटिळक, तानाजीराव जाधव, रामलिंग वाघमारे व संस्था पातळीवर ‘वृक्षदाई’ संस्था, देहू यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

सोमवार दि. २ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५ वा., हिराचंद नेमचंद वाचनालय, अँफी थिएटर येथे सदरील पुरस्कार वितरण प्रो. सुनिलराव गायकवाड (मा. खासदार, लातूर लोकसभा) यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष मा राजाभाऊ सरवदे असणार आहेत. मार्गदर्शक करण्यासाठी ह.भ.प. शिवाजीराव मोरे महाराज देहूकर (जगद्गुरु तुकोबाराय यांचे वंशज) उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. नरसिंग मेंगजी (माजी आमदार), मा. नितीन कवठेकर (डॉ. हेडगेवार ब्लड बँक), प्रा. अलका सपकाळ (ज्येष्ठ कवयित्री) इ. मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng