ह.भ.प. शरद महाराज घोळवे यांचे माळशिरस येथील शिंदेवस्ती येथे सुश्राव्य कीर्तन होणार
शिंदेवस्ती येथे कै. सौ. संगीता शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी, महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथील शिंदेवस्ती ५८ फाटा येथे कै. सौ. संगीता नामदेव शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त शनिवार दि. २०/८/२०२२ रोजी वारकरी साहित्य परिषदेचे इंदापूर तालुका अध्यक्ष ह.भ.प. शरद महाराज घोळवे यांचे सुश्राव्य कीर्तन सकाळी ९.३० वा. होणार आहे. दुपारी १२ वा. फुलांचा कार्यक्रम होणार आहे. पुष्पवृष्टी झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. नामदेव जगन्नाथ शिंदे आणि शिंदे परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.
माळशिरस शिंदेवस्ती येथील कै. सौ. संगीता नामदेव शिंदे यांचा स्वभाव मनमिळावू होता. त्या मोठी आई या नावाने परिचित होत्या. त्यांच्या पश्चात पती श्री. नामदेव जगन्नाथ शिंदे, एक मुलगा, दोन मुली, एक सून, नातवंडे असा परिवार आहे. तरी सर्व मित्र परिवार, नातेवाईक यांनी प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. नामदेव शिंदे, मुलगा अमोल शिंदे आणि शिंदे परिवार यांच्याकडून करण्यात येत आहे. नजरचुकीने निमंत्रण अथवा हस्ते परहस्ते आपणापर्यंत निरोप मिळाला नसेल तर हेच आमंत्रण समजुन येण्याचे अगत्य करावे, असे आवाहन शिंदे परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Dallis Mastalli