१०९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर
सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्यातील १०९ ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारीमध्ये संपली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून या ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठीचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर झाला आहे. १४ जुलै रोजी ग्रामपंचायतींची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर केली जाणार आहे. प्रभाग निहाय आरक्षण सोडते साठी २१ जून रोजी विशेष ग्रामसभा बोलावून तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. २३ जून रोजी प्रभाग निहाय आरक्षण प्रारूप अधिसूचनेला जिल्हाधिकारी मान्यता देतील.
२६ जून रोजी प्रभाग निहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जातील. २७ जून ते ३ जुलै या कालावधीत प्रभाग निहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी ठेवण्यात आला आहे. ७ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय देणे. १२ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेस जिल्हाधिकारी मान्यता देतील. १४ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब होईल.
करमाळ्यातील १६, माढ्यातील १४, बार्शीतील ५, मोहोळमधील २, पंढरपूरमधील ३, माळशिरसमधील १०, सांगोल्यातील ४, मंगळवेढ्यातील २७, दक्षिण सोलापूर मधील १०, अक्कलकोट मधील १८ अशा एकूण १०९ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रस्तावित आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This article really captured my attention! The depth of information combined with the engaging writing style made it a pleasure to read. I’m curious to hear other readers’ thoughts on this topic. Feel free to check out my profile for more interesting discussions!