२०२२ मधील सततच्या पावसाने झालेली नुकसान भरपाई म्हणून करमाळा तालुक्यातील कोर्टी केतुर करमाळा मंडल मधील शेतकऱ्यांना ८ कोटी ५० लाख रुपये मिळणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा फायदा
करमाळा (बारामती झटका)
ऑक्टोबर २०२२ कालावधीत करमाळा तालुक्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेत पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईबद्दल पंचनामे करण्याची मागणी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. या नुकसान भरपाईची केतुर, कोर्टी, करमाळा या मंडळाचे भरपाई देण्याची प्रक्रिया थांबली होती. शिवसेनेच्या पाठपुरावाने करमाळा तालुका कृषी कार्यालयाने याचे पंचनामे करून प्रस्ताव सादर केला होता. ही नुकसान भरपाई मिळावी म्हणून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता.
ऑक्टोंबर २०२२ मधील पंचनामे झालेल्या जिरायत क्षेत्रातील ज्वारी, उडीद, तूर, मका, सूर्यफूल, कापूस, बाजरी, सोयाबीन या बाधित ५८७१ हेक्टर क्षेत्रासाठी ७ कोटी ९८ लाख ५७ हजार २४ रुपये मंजूर झाले असून या आठवड्यात या रकमेचे वाटप होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे.
या सततच्या पावसाने फळबागांच्या झालेल्या १४७ हेक्टर नुकसानीपोटी ५३ लाख १७ हजार ५६० रुपये मंजूर झाले आहेत.
दादासाहेब थोरात उपतालुका प्रमुख शिवसेना जेऊर
आत्तापर्यंतच्या इतिहासात केवळ अतिवृष्टी झाली किंवा दुष्काळ पडला तरच नुकसान भरपाई मिळत होती. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियमात बदल करून सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली आहे.
संजय वाकडे तालुका कृषी अधिकारी करमाळा
शासनाच्या आदेशाप्रमाणे कृषी खात्यातील कर्मचाऱ्यांनी केवळ दहा ते पंधरा दिवसात नुकसानग्रस्त पिकाची पाहणी करून वेळेत पंचनामे करून शासनास अहवाल सादर केला. आज हा निधी मंजूर झाल्यामुळे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीचा आधार मिळणार आहे.
२०२२ मध्ये अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा उतरलेला होता. सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले पण, एकाही विमा कंपनीने शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिलेली नाही. मात्र, संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासनाच्यावतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Very informative and funny! For those curious to know more, check out: FIND OUT MORE. Let’s discuss!