२५ मे ला ओबीसी आरक्षण मागणारी ‘मराठा वनवास यात्रा’ पुण्यात दाखल होणार!…
तुळजापूर ते मंत्रालय मुंबई असा ५०० किलोमीटर प्रवास करत ही यात्रा मुंबईवर धडकणार
पुणे (बारामती झटका)
४२ डिग्रीच्याही पुढे तापमान गेले. अक्षरशः सूर्य आग ओकत आहे. अशाही स्थितीत सव्वा तीनशे किलोमीटरचा टप्पा पूर्ण करत मराठा समाजाची वनवास यात्रा उद्या पुण्यात पोहचणार आहे. मराठा समाजाला ५०% च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी तुळजापूरपासून मुंबईपर्यंत पायी चालत जाणारे हे आगळे वेगळे आंदोलन सध्या महाराष्ट्रात सुरू आहे.
गोणपाटाचे वस्त्र परिधान करून, मराठा बांधव वाटचाल करत आहेत. प्रभू श्रीरामचंद्र यांना १४ वर्षे वनवास भोगावा लागला. परंतु मराठा समाजाला गेली अनेक दशके आरक्षणाच्या बाबत वनवास भोगावा लागत आहे. तो आरक्षणाचा सुरू असलेला वनवास मिटावा यासाठी ही मराठा वनवास यात्रा असल्याचे श्री. योगेश केदार यांनी सांगितले.
तुळजापूर ते मुंबईच्या वाटेत लागणाऱ्या प्रत्येक शहरात आणि गावोगावी सभा बैठका घेत आरक्षण म्हणजे नेमके काय ?, संविधानात तरतुदी काय आहेत ?, राज्य कर्त्यानी नेमकी फसवणूक कशी केली ?, यापुढे मराठा समाजाची नेमकी भूमिका काय असावी ?, याबाबत जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात देखील भव्य सभा घेतली जाणार आहे. सकाळी १० वाजता लाल महाल येथे सभा होईल.
कार्यक्रमाचे स्वरूप.
२४ तारखेला रात्रीचा मुक्काम वानवडी येथील श्रीमंत महादजी शिंदे सरकार यांच्या स्मारकाच्या ठिकाणी असेल.
२५ तारखेला सकाळी ८ वाजता स्वारगेटमार्गे लाल महाल इथपर्यंत जनजागृती मिरवणूक होईल. यात ३०० वारकरी सहभागी होतील. हजारो लोक मिरवणुकीत असणार आहेत. तसेच लाल महाल याठिकाणी ठीक १० वाजता सभा घेण्यात येईल. महाराष्ट्रातील फुगीर आरक्षण व मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण कसे मिळेल ?, याविषयीचे मार्गदर्शन केले जाईल.
जास्तीत जास्त समाज बांधवांनी या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहावे, अशी विनंती सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
I loved the wit in this piece! For additional info, click here: EXPLORE FURTHER. Keen to hear everyone’s views!