५०% च्या आत ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी निघालेली मराठा वनवास यात्रा अंतिम टप्प्यात…
माळशिरस तालुक्यातील रणजीत भाकरे या युवकाचा सुरुवातीपासून प्रवास सुरु…
माळशिरस (बारामती झटका)
मराठा समाजाला ५०% च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी तुळजापूरपासून पायी चालत ‘मराठा वनवास यात्रा’ मुंबईला निघाली आहे. गोणपाटाचे वस्त्र परिधान करून, मराठा बांधव वाटचाल करत आहेत. आरक्षणाचा सुरू असलेला वनवास मिटावा यासाठी ही मराठा वनवास यात्रा निघाली आहे. ही यात्रा आता अंतिम टप्प्यात आली आहे. या मराठा वनवास यात्रेत लाखो तरुणांनी सहभाग नोंदविला आहे.
माळशिरस तालुक्यातील पिसेवाडी येथील रणजीत भाकरे हे देखील अगदी सुरुवातीपासून या यात्रेत सहभागी झाले आहेत. माळशिरस तालुक्यातील हा तरुण सुरुवातीपासून या यात्रेत पायी आलेला आहे.
तुळजापूर ते मुंबईच्या वाटेत लागणाऱ्या प्रत्येक शहरात आणि गावोगावी सभा बैठका घेत आरक्षण म्हणजे नेमके काय ?, संविधानात तरतुदी काय आहेत ?, राज्य कर्त्यानी नेमकी फसवणूक कशी केली ?, यापुढे मराठा समाजाची नेमकी भूमिका काय असावी ?, याबाबत जनजागृती केली जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng