Uncategorizedताज्या बातम्या
ॲड. सुजितकुमार थिटे पाटील आणि ॲड. काजल सातपुते पाटील यांच्या शुभविवाहास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा
वेळापूर (बारामती झटका)
उंबरे वेळापूर, ता. माळशिरस येथील श्री. अभिमान श्रीमंत थिटे पाटील यांचे चिरंजीव ॲड. सुजितकुमार आणि अकोले, ता. मुळशी येथील श्री. कैलास मारुती सातपुते पाटील यांची कन्या ॲड. काजल यांचा शुभविवाह दि. ११ फेब्रुवारी २०२३ रोजी थाटामाटात संपन्न झाला.
या शुभविवाहास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. या पत्रामध्ये नरेंद्र मोदी यांनी वधू वरांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच वैवाहिक जीवनात तुम्हाला भरपूर आनंद मिळो. विश्वास आणि मित्रत्वाच्या नात्याने तुम्ही सदैव बंधनात रहा. सुखी संसार करत तुमच्यातले नाते आणखी घट्ट होवोत, अशा शुभेच्छा दिल्या.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng