१७ वर्षाखालील राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाची निवड चाचणी २८ जुन रोजी म्हांळुगे – बालेवाडी स्टेडियम येथे होणार – पै. संदीप भोंडवे

पुणे (बारामती झटका)
भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने १७ वर्षाखालील राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (कॅडेट नॅशनल) ५ ते ७ जुलै रोजी उत्तराखंड येथे आयोजित होत आहेत. ही स्पर्धा पुरुष फ्रीस्टाईल, ग्रिकोरोमन व महीला अशा ३ विभागात होत आहे . या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाची निवड चाचणी २८ जुन रोजी म्हांळुगे – बालेवाडी स्टेडियम येथे होत आहे. ही निवड चाचणी खुल्या पध्दतीने होत असुन खालील वजन व जन्मतारखेच्या नियमात बसणारा महाराष्ट्राचा कोणताही कुस्तीगीर या निवड चाचणीत सहभागी होऊ शकतो.
निवड चाचणीची माहीती
निवड चाचणी – पुरुष फ्रीस्टाईल, ग्रिकोरोमन व महीला विभाग
दि. – २८ जुन २०२४
स्थळ – बाॅक्सिंग हाॅल, म्हाळुंगे- बालेवाडी स्टेडियम
वेळ – सकाळी ८.०० ते १०.००
कुस्ती स्पर्धा – सकाळी १०.०० ते संपेपर्यंत
वजन सुट – १ कीलो
जन्मतारीख पुरावा – ओरीजिनल आधारकार्ड
जन्मतारीख – २००७, २००८ व मेडिकल देऊन २००९

टीप –
१) निवड चाचणीकरीता प्रवेश फी ५०० रुपये आकारण्यात येईल.
२) पासपोर्टची अट नाही.
३) कॅडेट आशियाई स्पर्धेसाठी महाराष्ट्रातुन फ्रीस्टाईल ४८ किलो, ५१ किलो, ६५ किलो व ग्रिकोरोमन ५५ किलो या वजनगटातील कुस्तीगीर निवड चाचणीच्या दिवशी परदेशात असल्याने या वजनगटात ज्यांची निवड होईल त्या कुस्तीगीरांना १ जुलै २०२४ रोजी या ४ वजन गटातील कुस्तीगीरांबरोबर ट्रायल द्यावी लागेल …
कळावे आपला
पै.संदीप उत्तमराव भोंडवे
कार्याध्यक्ष – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.