भुताष्टे येथे आर्थिक साक्षरता अभियान संपन्न
माढा (बारामती झटका)
भुताष्टे (ता. माढा) येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्हाभरात आर्थिक साक्षरता सप्ताह राबविला जात आहे. युनियन बँक ऑफ इंडिया शाखा माढा व क्रीसिल फाउंडेशन मुंबई यांच्यावतीने ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक व युवक-युवतींची वैयक्तिक व कौटुंबिक उद्दिष्टे पूर्ण होण्यासाठी व त्यांना आर्थिक बाबींविषयी ज्ञान व कौशल्य मिळून त्या परिपूर्ण होण्यासाठी गावोगावी जाऊन आर्थिक व डिजिटल साक्षरता अभियान सुरू केले आहे.
अभियानाच्या माध्यमातून भुताष्टे (ता. माढा) येथे युनियन बँक ऑफ इंडिया शाखा माढा यांच्यावतीने महिला व पुरुष युवक यांना आर्थिक साक्षरता अभियान प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी महिलांची नवीन बचत खाती उघडून त्यांना २ लाख विम्याचा लाभ, बँकेचे एटीएम कार्ड व बँकेच्या अन्य योजना याबाबत माहिती देवून जागृती करण्यात आली. यावेळी बँकेचे माढा व्यव्थापक महेश घोलप, क्रीसिल फाउंडेशनचे केंद्र व्यवस्थापक अविनाश शिंदे, बँक मित्र संतोष यादव, सरपंच प्रतिनिधी सुरेश यादव, मा. सरपंच दिलीप काका यादव, मा. ग्रामपंचायत सदस्य संभाजी पाटील, भास्कर यादव, मोहन यादव, राजेंद्र यादव, दत्तात्रय यादव, संभाजी व्यवहारे, बिरुदेव हाके, मोहन यादव, जनार्दन व्यवहारे, भास्कर कुलकर्णी, महिला बचत गटाच्या अश्विनी नलवडे, सुरेखा यादव, सुरेखा परांडे मॅडम, शैला सुतार, सारिका यादव आदी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामजिक कार्यकर्ते सागर यादव यांनी केले तर संभाजी पाटील यांनी आभार मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng