ताज्या बातम्यासामाजिक

26 जानेवारी रोजी वडापुरी येथील पाणीपुरवठा कर्मचारी नारायण पवार करणार आमरण उपोषण.

13 महिन्यापासून ग्रामपंचायत प्रशासनाकडून पगार मिळाला नाही, कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ.

पगार मिळत नसूनही गेली वर्षभर इमानदारीने पाणी सोडण्याचे काम करत आहे

वडापुरी (बारामती झटका)

वडापुरी (ता. इंदापूर) येथील ग्रामपंचायतीकडे गेल्या आठ वर्षांपासून पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून कामाला असलेले नारायण प्रभाकर पवार यांनी गेल्या दीड वर्षांपासून पगार मिळाला नाही म्हणून दि. 26 जानेवारी रोजी इंदापूर पंचायत समिती समोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे. तसे निवेदन देखील इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले आहे.

सदर निवेदनात असे म्हटले आहे की, मी वडापुरी गावचा कायम रहिवासी असून गेल्या आठ वर्षापासून या ग्रामपंचायतीकडे पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून काम करत आहे. मागील सहा वर्षात माझा पगार वेळेत होत होता. परंतु, दोन वर्षात वर्षाला एक किंवा दोन पगार दिले जातात आणि बाकीच्या पगाराला वसुली नाही, असे कारण दिले जाते. परंतु, माझ्या माहितीप्रमाणे ग्रामपंचायत कर वसुली महिन्याला 25 ते 30 हजार रुपये होते. तसेच मी इतर कामगारांच्या संपामध्ये किंवा ग्रामपंचायत कार्यालयाच्या संपामध्ये कधीही सहभागी झालो नाही. ग्रामपंचायतीच्या कामात कधीही खंड पडून दिलेला नाही. सदर तत्व त्यांनी गावातील नागरिकांना मी पाणीपुरवठ्याची सेवा देत आहे. परंतु माझे मासिक वेतन मागील 13 महिन्यापासून मिळाले नाही. तसेच जिल्हा परिषदेच्या विषयाचे वेतन मिळण्यासाठी ग्रामपंचायतीकडून माहिती ए आर पी लॉगिन मधून भरायचे असते. ती न भरल्यामुळे माझे जिल्हा परिषदेकडून येणारे वेतनही बंद झालेले आहे. त्यामुळे माझ्याबरोबर माझ्या परिवाराची उपासमारीची वेळ आली आहे. तरी आपल्या स्तरावरून वेतन मिळावे असे या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जर मला पगार मिळाला नाही तर 26 जानेवारी रोजी पंचायत समिती, इंदापूर आवारामध्ये आमरण उपोषणासाठी लोकशाहीच्या मार्गाने शांततेत बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

26 जानेवारी रोजी ग्रामपंचायत कर्मचारी प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे व उपासमारीमुळे जर आमरण उपोषण करण्याची वेळ येत असेल तर कर्मचाऱ्यांनी जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे नारायण पवार यांनी सांगितले.

मान, आयुक्त सो, विधान भवन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे, नायब तहसीलदार व पोलीस निरीक्षक तसेच गट विकास अधिकारी यांना माझ्या पगाराबद्दल निवेदन दिले आहे. जर 26 जानेवारीच्या अगोदर माझा प्रश्न मिटला नाही तर मी शांततेच्या मार्गाने पंचायत समिती इंदापूरच्या आवारात आमरण उपोषणास बसणार असल्याचे नारायण पवार यांनी सांगितले.

नारायण पवार यांनी पुढे म्हटले आहे की, मी दिलेल्या निवेदनानंतर गटविकास अधिकारी सो. यांनी मला 26 जानेवारी रोजी करणारे आमरण उपोषण स्थगित करावे असे सांगितले आहे. परंतु, मला हे मान्य नसून जोपर्यंत मला पगार मिळत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषणाला बसणारच असे सांगितले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button