५ लाखांची लाच घेताना न्यायाधीश धनंजय निकम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले
सातारा (बारामती झटका)
अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी आणि सत्यासाठी न्यायालय हा नागरिकांचा शेवटचा आश्रय मानला जातो. मात्र, न्याय व्यवस्थेवरच गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या घटनेत, साताऱ्यातील जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये न्यायाधीश धनंजय निकम यांनी एका प्रकरणाचा निकाल पक्षपातीपणे देण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल करण्यात आली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाने सापळा रचला. संबंधित तक्रारदाराने ठरल्याप्रमाणे न्यायाधीशांना लाच दिली, त्याच वेळी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करत न्यायाधीशांसह इतर दोघांनाही रंगेहात पकडले.
जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. पकडलेल्या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या घटनेने संपूर्ण न्यायालयीन व्यवस्थेत खळबळ उडवली आहे. न्यायाधीशांसारख्या जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीकडून लाच घेतल्याच्या घटनेमुळे न्यायालयीन व्यवस्थेवरील विश्वासाला तडा गेल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
न्यायाधीशांसारख्या उच्चपदस्थ व्यक्तीकडून अशा प्रकारे कायद्याचा गैरवापर होणे गंभीर असून संबंधित प्रकरणाची चौकशी जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघड केलेल्या या प्रकरणामुळे त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. इतक्या मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करणे हे निश्चितच धाडसी पाऊल आहे.
संबंधित आरोपींवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणातून न्यायाधीश महोदयांसह इतर अधिकारी व कर्मचारी यांच्यावर देखील प्रभाव पडण्याची शक्यता आहे. राज्यभरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात असून कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
escort kuşadası ilan Kuşadası gece hayatı oldukça hareketli ve eğlenceliydi. https://yruz.ix.tc/read-blog/9247
escort bayan kuşadası Güvercinada’nın ışıklandırması gece çok güzel görünüyordu. https://yruz.ix.tc/read-blog/9247
Vip Kuşadası Escort Bayanlar Kuşadası’ndaki yerel tatları denemeden dönmeyin. https://yruz.ix.tc/read-blog/9247
rgywep