८ नोव्हेंबरला मुख्यमंत्री करमाळ्यात; दिग्विजय बागल यांच्या प्रचारार्थ भव्य सभा
करमाळा (बारामती झटका)
महायुतीचे अधिकृत उमेदवार दिग्विजय दिगंबर बागल यांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ८ नोव्हेंबर रोजी करमाळा येथे येत असून दुपारी १२ वा. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांची भव्य सभा होणार असून या सभेला करमाळा विधानसभा मतदारसंघातील लाखो मतदारांनी व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे.
अत्यंत राजकीय घडामोडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करमाळा विधानसभेसाठी दिग्विजय दिगंबरराव बागल यांना अधिकृत उमेदवारी दिली असून त्यांना निवडून आणण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताकद लावून निवडणूक प्रतिष्ठित केली आहे.
याबाबत माहिती देताना जिल्हाप्रमुख चिवटे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी ११ वा. सोलापूर विमानतळावर येणार असून तेथून हेलिकॉप्टरने करमाळा येथे येणार आहेत. त्यांची १२ वा. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात सभा होणार असून या सभेनंतर पुढे त्यांच्या परंडा, बार्शी, धाराशिव, उमरगा अशा चार सभा आहेत.
ही सभा यशस्वी करण्यासाठी भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल, शिवसेनेचे समन्वयक विलासराव घुमरे, उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष सुरेश कर्चे, शहरप्रमुख संजय शिलवंत, महिला आघाडी नेत्या पद्मजा इंगवले, उपजिल्हाप्रमुख ज्योतीताई शिंदे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत राखुंडे, युवा सेना तालुकाप्रमुख नवनाथ गुंड, उपतालुकाप्रमुख डॉ. गौतम रोडे, बाळासाहेब वाघ, दादासाहेब तनपुरे, वैद्यकीय सहाय्यक दीपक पाटणे, नागेश चेंडगे, कुरूडवाडी शहर प्रमुख समाधान दास, महिला आघाडी शहर प्रमुख कीर्ती स्वामी, रोहित बलाक्षी, सागर कोल्हे, अनिता पवार, आदी शेकडो पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. याशिवाय भाजप, आरपीआय, रयत शेतकरी संघटना, अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी गट पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Mountsinai Nice post. I learn something totally new and challenging on websites
Hi Neat post Theres an issue together with your web site in internet explorer may test this IE still is the marketplace chief and a good component of people will pass over your fantastic writing due to this problem
Mountsinai I very delighted to find this internet site on bing, just what I was searching for as well saved to fav
Blue Techker You’re so awesome! I don’t believe I have read a single thing like that before. So great to find someone with some original thoughts on this topic. Really.. thank you for starting this up. This website is something that is needed on the internet, someone with a little originality!
Noodlemagazine This is really interesting, You’re a very skilled blogger. I’ve joined your feed and look forward to seeking more of your magnificent post. Also, I’ve shared your site in my social networks!