नातेपुते येथील डॉ. बाळकृष्ण दाते प्रशालेच्या शिरपेचामध्ये शिक्षक संजय पवार यांनी रोवला मानाचा तुरा.
नातेपुते ( बारामती झटका )
सोलापुर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ यांच्यावतीने या वर्षीचा देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार नातेपुते येथील डाॅ. बाळकृष्ण जयवंत दाते प्रशाला येथील सांस्कृतिक विभागाचे संजय पवार यांना देण्यात आला आहे. त्यांनी प्रशालेच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवलेला आहे. सांगोला येथील फॅबटेक काॅलेजमध्ये माजी आमदार दिपकआबा साळूंखे पाटील यांच्याहस्ते देण्यात आला. संजय पवार यांचे सामाजिक, शैक्षणिक काम, कोरोना काळात केलेले उल्लेखनीय काम, शालेय सहल, पर्यावरण संवर्धन याबद्दल हा पूरस्कार देण्यात आला.
या कार्यक्रमास माजी आमदार दिपक साळूंखे पाटील, माजी अध्यक्ष शिवाजीराव जमाले, भारत इंगवले, सागर पाटील, सचिन झाडबूके, प्रबूद्धचंद्र झपके, भाऊसाहेब रूपनवर, प्रविण बडवे, राजेंद्र काळे, विकास काळे, हनूमंत वाघमोडे, अनिल सावंत, हनूमंत बनसोडे, तूकाराम भोमाळे, धवल गांधी, अमोल पिसे, संभाजी कोकाटे, यशवंत चव्हाण, पोपट डोईफोडे, सूधाकर भोमाळे, विनोद काळे, रोहीत उराडे, नितीन काळे, सचिन ठोंबरे आदी उपस्थित होते.
नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, डॉ. बाळकृष्ण दाते प्रशालेचे सभापती जननायक मामासाहेब पांढरे व संचालक मंडळ, प्रशालेतील प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक यांनी अभिनंदन केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng