Uncategorizedक्रीडाताज्या बातम्या

विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची गुजरात येथे होणाऱ्या 36 व्या नॅशनल स्पर्धेतील खेळाडूंच्या गेम्स कॅम्पला सदिच्छा भेट.

गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुण्यातील मल्लाचा सहभाग

माळशिरस तालुक्यातील कण्हेर गावचा पै. वैभव माने यांची 125 वजन गटात निवड

माळशिरस ( बारामती झटका )

गुजरात येथे 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये विविध खेळातील खेळाडूंचे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिर खेळाडूंच्या गेम्स कॅम्पला महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी सदिच्छा भेट देऊन खेळाडूंचे मनोधैर्य वाढवलेले आहे.

57 किलो वजन गटात सुरज अस्वले, 65 किलो वजन गटात अक्षय होरगुडे, 74 वजन किलो गटात नरसिंह यादव, 86 किलो वजन गटात वेताळ शेळके, 97 किलो वजन गटात चालू सीजनचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, कुस्ती क्षेत्रातील अर्जुनवीर पुरस्कार प्राप्त काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुण्यातील मल्लाचा माळशिरस तालुक्यातील कण्हेर गावचा पैलवान वैभव माने 125 किलो (ओपन) वजन गटात नॅशनल स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य गौतमआबा माने पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांचा पैलवान वैभव माने पुतण्या आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे येथे अर्जुनवीर पुरस्कार काका पवार व वस्ताद गोविंद तात्या पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पैलवान वैभव माने यांची कुस्ती क्षेत्रामध्ये घोडदौड सुरू आहे. माने पाटील घराण्याने कुस्तीची परंपरा जोपासलेली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरचे खासबाग मैदान व सांगली जिल्ह्यातील कुंडलचे मैदान यानंतर पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठे मैदान कण्हेर (ता. माळशिरस) येथे होत असते. महाराष्ट्रातील अनेक नामांकित मल्ल कण्हेरच्या मैदानामध्ये खेळलेले आहेत. माळशिरस तालुक्यामधील पैलवानांना प्रोत्साहन देण्याकरिता गौतमआबा व बाबासाहेब राम-लक्ष्मणासारखी भावा भावाची जोडी कायम मैदानावर उपस्थित असते. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पैलवानांच्या खुराकमध्ये भर घालण्याकरता बक्षिसांची मैदानामध्ये दोन्ही बंधूंकडून खैरात सुरू असते. माने पाटील परिवार यांनी सुद्धा आपल्या घरात पैलवानकी जोपासलेली आहे.

सध्या महाराष्ट्रामध्ये पैलवान वैभव माने व पैलवान शुभम माने कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत गुजरात येथे होणाऱ्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 125 किलो ओपन गटात पैलवान वैभव माने याने दैदीप्यमान यश संपादन करून नॅशनल स्पर्धेत खेळण्याचा बहुमान मिळवलेला आहे. पै. वैभव माने याने कुस्ती क्षेत्राच्या शिरपेचामध्ये माळशिरस तालुक्याचा मानाचा तुरा रोलेला आहे. गुजरात येथील स्पर्धेसाठी पै. वैभव माने याच्यावर माळशिरस तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Back to top button