भांब येथे पांढरे मेडिकल नातेपुते यांच्यावतीने लंम्पी रोग प्रतिबंधक मोफत लसीकरण करण्यात आले.
म्हाडाचे उपमुख्य अभियंता भीमराव काळे व उद्योजक धुळाशेठ शेंडगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी बाबा दरा कुस्ती संयोजन कमिटीचा स्तुत्य उपक्रम.
नातेपुते ( बारामती झटका )
भांब ता. माळशिरस येथे लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव फैलू नये शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी पांढरे मेडिकल नातेपुते यांच्यावतीने भांब येथील पाटील वस्ती वार्ड क्र. ३, वार्ड क्र. १ मधील ४०० जनावरांना मोफत लसीकरण करण्यात आलेले आहे. भांब येथे लंम्पी रोगाच्या लागणीला सुरुवात झालेली होती. या रोगाचा फैलाव होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जनावरांना मोफत लसीकरण उपमुख्य अभियंता भीमराव काळे व उद्योजक धुळाशेठ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यावेळी पांढरे मेडिकलचे मालक व संभाजी बाबा दरा कुस्ती कमिटीचे अध्यक्ष रघुनाथ पांढरे, पंढरीनाथ काळे, भानुदास शेंडगे, गोविंद शेंडगे, सोपान काळे, भीमराव पांढरे, भाऊ पाटील, पोपट काळे, ग्रामपंचायत सदस्य पप्पू काळे, बबन काळे, प्रकाश शेंडगे, धनाजी काळे, रणजीत पाटील, संजय काळे, राजू काळे, माऊली खरात, रामचंद्र ढवळे, बापूराव मदने, महादेव काळे, दत्तू काळे, विजय पांढरे, विष्णू पांढरे, वार्ड क्रमांक ३ व वार्ड क्र. १ मधील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरचे लसीकरण डॉ. प्रमोद पांढरे भांब, डॉ. शिंदे मांडवे यांनी अथक परिश्रम करून लसीकरण केलेले आहे. त्यांना जय भवानी गणेश मंडळ पाटील वस्ती भांब यांच्यावतीने मानधन देण्यात आले.

म्हाडाचे उपमुख्य अभियंता भीमराव काळे व बेंगलोर येथे उद्योग व्यवसाय सुरू असणारे उद्योजक धुळा शेठ शेंडगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी बाबा दरा कुस्ती संयोजन समिती भांब गावामध्ये समाज उपयोगी स्तुत्य उपक्रम राबवत असतात.

कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव असताना सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आलेले होते. लंम्पी रोगाच्या प्रादुर्भावापासून मुक्या प्राण्यांची सुटका व्हावी, यासाठी मोफत लसीकरण केलेले आहे. या स्तुत्य उपक्रमाचे शेतकरी व सर्वसामान्य जनतेमधून कौतुक केले जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
