उंबरे दहिगाव सेवा सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत सभासदांना दहा टक्के डिव्हिडंट वाटप.
भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वसाधारण सभेतील निर्णयाने सभासदात आनंदाचे वातावरण
उंबरे दहिगाव (बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील उंबरे दहिगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्तव्यदक्ष चेअरमन विजयकुमार मोहन ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत सभासदांना 10% डिव्हीडंट देण्याची घोषणा करताच सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले होते. सर्वसाधारण सभेला व्हाईस चेअरमन सौ. ताराबाई सदाशिव नारनवर, संचालक तानाजी बापू ठोंबरे, सौ. छायादेवी सोपानराव नारनावर, श्री. शिवाजी अण्णा पाटील, श्री. बाजीराव शिवाजी वाघमोडे, श्री. शंकर शिवा ठोंबरे, श्री. पोपट महादेव मोरे, श्री. शहाजी महादेव नारनवर, श्री. भगवान नामदेव ठोंबरे, श्री. भीमराव नामदेव मकर, राजेंद्र शंकर वाघमोडे, श्री. बाळू लक्ष्मण गोरे यांच्यासह संजय गांधी निराधार योजनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर, ज्येष्ठ नेते सदाशिवराव नारनवर, विद्यमान सरपंच विष्णुपंत नारनवर, ग्रामपंचायत सदस्य संजय अनंता ढेकळे, पांडुरंग ढेकळे, दशरथ मकर, पांडुरंग ठोंबरे, बाळूभाऊ ठोंबरे, शंकर लक्ष्मण वाघमोडे, अनिल रामचंद्र वाघमोडे, कमल मुलाणी, कल्याण गणपत नारनवर, बाबासाहेब संदिपान नारनवर, संजय पांडुरंग समिंदर, धोंडीबा भीमा बोडरे, धुळदेव गणपत पाटील, युवराज हनुमंत नारनवर, ज्ञानदेव धुमाजी नारनवर, भगवान घोगरदरे, सोपान आप्पा वाघमोडे, माजी चेअरमन विठ्ठल श्रीपती नारनवर, ज्येष्ठ नेते पांडुरंग पाटील, तानाजी ढोबळे, पोपट ठोंबरे, शंकर देवबा ठोंबरे, शिवाजी पिंगळे, बाळू महादेव बोडरे, मारुती रणदिवे, लक्ष्मण मारुती ठोंबरे, शंकर बापू ठोंबरे, विठ्ठल सिताराम ढेकळे, अंकुश वाघमोडे, किसन दत्तू सरगर, प्रकाश रामचंद्र नारनवर, विकास नारनवर, निवृत्ती ठोंबरे, माऊली तरंगे, टेलर हनुमंत ठोंबरे यांच्यासह सर्व सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे डिव्हीडंट वाटलेला नव्हता. काही महिन्यापूर्वी सोसायटीची निवडणूक झालेली होती. जेष्ठ नेते सोपानकाका नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीवर दणदणीत विजय मिळवलेला होता. सभासदांनी संचालकावर टाकलेला विश्वास त्यामुळे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळ यांनी निर्णय घेऊन दहा टक्के डीव्हीडंट वाटण्याचे ठरवले. सदर संस्थेचे ६०० सभासद आहेत. तीन कोटीच्या आसपास वाटप केलेले आहे. संस्थेचे कर्तव्यदक्ष सचिव अनिल साहेबराव चव्हाण संस्थेचा कारभार पारदर्शक व सभासदांच्या हिताच्या दृष्टीने चालवत आहेत. दहा टक्के डिव्हिडंट जाहीर केलेला असल्याने उंबरे दहिगावच्या सेवा सोसायटीच्या सभासदांच्या घरी आनंदाने दिवाळी साजरी होणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng