गोरडवाडी येथे ग्रामदैवत बिरोबा यात्रेनिमित्त प्रथमच शेळी मेंढरांची यात्रा भरणार…
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापनेनंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शेळी व मेंढरांच्या जातीची एक दिवशीय भव्य यात्रा
माळशिरस ( बारामती झटका )
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सोमवारी घटस्थापना होणार आहे. प्रथमच घटस्थापनेनंतर गोरडवाडी ता. माळशिरस येथे ग्रामदैवत श्री बिरोबा यात्रेनिमित्त मंगळवार दि. 27/09/2022 रोजी दिवसभर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शेळी व मेंढरांच्या जातीची भव्य यात्रा भरणार आहे.
माळशिरस तालुक्यात शेळी, मेंढी पालन करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. यात्रेत अनेक जातींच्या शेळ्या व मेंढ्या येणार आहेत. त्यामुळे पंचक्रोशीतील लोकांना खरेदी विक्रीचा फायदा व्हावा यासाठी, बिरोबा यात्रेनिमित्त समस्त ग्रामस्थ व बिरोबा यात्रा कमिटी यांच्यावतीने भव्य शेळी मेंढी यात्रा महोत्सव पहिल्यांदाच भरविण्यात येणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा.
श्री नाना गोरड 7744884536, नाना हुलगे 9763357307, दत्तू गोरड 9763003117, सचीन हुलगे 8605474835, धोंडीबा कोकरे 8600495617 या नंबरशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng