पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडून माळशिरस तालुक्यातील विकासकामांना झुकते माप मिळणार, बॅकलॉग भरून निघणार.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दृढ राजकीय संबंधांचा फायदा होणार.
अकलूज ( बारामती झटका )
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस सरकारने अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी राज्याचे महसूल दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी दिलेली असल्याने माळशिरस तालुक्यातील विकासकामांना झुकते माप मिळणार असून महाविकास आघाडी सरकारने विकासापासून वंचित ठेवलेला बॅकलॉग भरून निघणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजकीय सलोख्याचे दृढ संबंधाचा फायदा माळशिरस तालुक्यातील प्रलंबित विकासकामांना होणार असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.
माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील आणि सहकारातील महामेरू बाळासाहेब विखे पाटील यांचे राजकीय हितसंबंध होते. पुढे त्यांचा वारसा विजयसिंह मोहिते पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजकीय सलोख्याचे दृढ संबंध जोपासले होते. खासदार सुजयसिंह विखे पाटील व माजी खासदार व विद्यमान आमदार रणजितसिंह मोहिते पाटील या दोघांनीही राजकीय घराण्याची परंपरा जोपासलेली आहे. विखे पाटील यांनी काँग्रेस मधून आणि मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी मधून भाजपमध्ये एकाच वेळी प्रवेश केलेला होता.

महाराष्ट्रामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार होते. सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे होती. माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे विधानसभेचे आमदार राम सातपुते व विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना डीपीडीसी मध्ये विकासकामात जाणीवपूर्वक डावलले जात होते. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील विकासाची गंगा अडखळत वाहत होती.
सध्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जबाबदारी आल्याने माळशिरस तालुक्यातील विकासकामांना झुकते माप मिळून बॅकलॉग भरून निघणार असल्याची माळशिरस तालुक्यातील जनतेला खात्री झालेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng