Uncategorizedआरोग्यताज्या बातम्या

होमिओपॅथिक पदवी अभ्यासक्रमात ‘आधुनिक औषधशास्त्र’ विषयाचा समावेश

नवी दिल्ली (बारामती झटका)

आज दि. 26 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय होमिओपॅथिक आयोग, नवी दिल्ली येथे होमिओपॅथिक पदवी अभ्यासक्रमाच्या सुधारीत मसुद्यामध्ये ‘आधुनिक औषधशास्त्र’ (मॉडर्न फार्माकालॉजी) हा विषय समाविष्ट केल्याबद्दल होमिओपॅथी राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिलजी खुराना यांना होमिओपॅथीचे नेते डॉ. अरुण भस्मे यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळाने त्यांचे विशेष आभार मानले व नॅशनल फेडरेशन ऑफ होमिओपॅथीक कॉलेज संघटनेच्यावतीने त्यांना या सुधारणेबद्दल सहमती दर्शवली.

राष्ट्रीय होमिओपॅथिक आयोगाचे अधिनियम 2020 चे कलम 55 (2) च्या तरतुदीनुसार संघटनेच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले. या संदर्भात नागरिकांना काही सुचना करायच्या असतील तर दि. 8 ऑक्टोबर 2022 पर्यंत आयोगाच्या [email protected] या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन राष्ट्रीय होमिओपॅथिक आयोगाने केलेले आहे.

मॉडर्न फार्माकालॉजी विषयाचा समावेश बी.एच.एम.एस. पदवी अभ्यासक्रमात करावा यासाठी होमिओपॅथीचे नेते डॉ. अरूण भस्मे व सहकारी यांनी आयोगाकडे सातत्याने पाठपुरावा केलेला होता. यासाठी डॉ. अरूण भस्मे यांनी सन 2013 मध्ये नागपूर विधानभवनासमोर सलग 12 दिवस आमरण उपोषण करून तत्कालीन महाराष्ट्र सरकारला मॉडर्न फार्माकालॉजी अभ्यासक्रम होमिओपॅथिक डॉक्टरांना देण्यास भाग पाडले होते.

या शिष्टमंडळात डॉ. आनंद कुलकर्णी, डॉ. विरेंद्र कवीश्वर, डॉ. पी. वाय कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब पवार, डॉ. बाळकृष्ण गायकवाड, डॉ. धनाजी बागल, डॉ. श्रीकांत कोकणी, डॉ. उत्तमराव महाजन, डॉ. अजय दहाड, डॉ. फारुख मोतीवाला, डॉ. शुभांगी मगदूम, डॉ. नंदिनी जोशी, डॉ. समीर पोळ, डॉ. देवेंद्र पाटील, डॉ. विजय दाभाडे, डॉ. आर. के. मिश्रा, डॉ. अनिरुध्द बिष्णोई, डॉ. जनकभाई मेहता, डॉ. अजय हुली, डॉ. राहुल पाटील, डॉ. कृष्णाजी केळकर, डॉ. महेंद्र गौशाल, डॉ. बामणे, डॉ. विनोद दद्नवर, डॉ. सईद अहमद, डॉ. रोशन, डॉ. प्रभू कुमार, डॉ. विमल कुमठ आदी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय होमिओपॅथिक आयोगाच्या एज्युकेशन बोर्ड, इथिकल बोर्ड व रेटिंग बोर्डचे प्रेसिडेंट सर्वश्री डॉ. तारकेश्वर जैन, डॉ. पिनाकिन त्रिवेदी, डॉ. के. आर. जनार्धन व आयोगाचे सेक्रेटरी डॉ. संजय गुप्ता उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button