माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची गोरगरीब रुग्णांसाठी दमदार कामगिरी सुरू आहे.
जनता दरबारातील राम राज्यात रामाने सर्वसामान्य जनतेच्या शरीरातील सर्व अवयवाचे मोफत ऑपरेशन केले, किडनी या उरलेल्या अवयवाचे सुद्धा मोफत उपचार करून महाकू विरकरला दिला दिलासा.
माळशिरस ( बारामती झटका )
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात जनता दरबारातील राम राज्यात रामाने सर्वसामान्य जनतेच्या शरीरातील सर्व अवयवाचे मोफत ऑपरेशन केलेली आहेत. शरीरातील महत्त्वाचा किडणी अवयव उरलेला होता. किडनीचे सुद्धा मोफत उपचार करून कचरेवाडी येथील महाकू मारुती वीरकर वय वर्ष 32 यांना दिलासा मिळवून दिलेला आहे. खऱ्या अर्थाने माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची गोरगरीब रुग्णांसाठी दमदार कामगिरी सुरू आहे. जनता दरबारामुळे सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे अनेक प्रश्न सुटलेले आहे. माळशिरस तालुक्यातील जनता राम सातपुते यांच्या जनता दरबार समाधानी आहे.
श्री. महाकू मारुती वीरकर वय वर्ष 32 रा. कचरेवाडी यांना किडनीचा आजार झालेला होता. सदरच्या किडनीच्या प्रत्यारोपण ऑपरेशनसाठी दहा ते बारा लाख रुपये खर्च येत होता. महाकू विरकर गरीब परिस्थितीमुळे पुणे येथे उदरनिर्वाहासाठी गेलेले आहेत. त्यांचा मिळणाऱ्या उत्पन्नातून घर प्रपंच चालत होता. दवाखान्याचा एवढा मोठा खर्च कसा करायचा, असा पेच प्रसंग निर्माण झालेला होता.
माळशिरस तालुक्यातील लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या जनता दरबारात अनेक विकासकामे, शासकीय योजना या कामांबरोबर व्यक्तिगत दवाखान्याची मोफत औषध उपचार व ऑपरेशन केलेली आहेत. पाय, हात, हृदय, ब्रेन ट्युमर अशा अनेक खर्चिक ऑपरेशन मोफत केलेली आहेत. माळशिरस तालुक्यात गावोगावी आ. राम सातपुते यांच्या गोरगरीब जनतेच्या कार्याचा गवगवा आहे. विरकर परिवारातील सदस्यांनी आ. राम सातपुते यांच्या जनता दरबारात कैफियत मांडलेली होती.
आ. राम सातपुते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रव्यवहार करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आर्थिक सहाय्य करण्याची विनंती केलेली होती. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून एक लाख रुपये मंजूर सुद्धा झालेली होती. महाकु विरकर यांची ऑपरेशनसाठी खर्च करण्याची ऐपत नव्हती. लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन सर्व परिस्थिती सांगितली, आग्रह केला. ऑपरेशन मोफत करण्यासाठी आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नाला यश येऊन मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश नरसिंह चिवटे यांनी जहांगीर हॉस्पिटल पुणे यांचे विश्वस्त यांना पत्रव्यवहार करून सदरच्या रुग्णावर मोफत उपचार करण्याच्या सूचना केल्या. जहांगीर हॉस्पिटल येथे श्री. महाकू मारुती वीरकर यांच्यावर किडनी प्रत्यारोपण ऑपरेशन केलेले आहे. आ. राम सातपुते यांनी जहांगीर हॉस्पिटलमध्ये जाऊन महाकू विरकर यांच्या तब्येतीची विचारपूस करून दिलासा दिला आहे. वीरकर परिवार यांच्या जीवनामध्ये खरंच प्रभू श्रीराम यांच्या राम राज्यात ज्याप्रमाणे राम प्रजेची काळजी घेत होते, त्याचाच प्रत्यय माळशिरस विधानसभा मतदारसंघातील जनतेला जनता दरबारामधून अनुभव येत आहे. माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य व गोरगरीब जनता समाधान व्यक्त करीत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng