श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची तिसरा हप्ता 200 रुपयाने सभासदांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू.
सदाशिवनगर (बारामती झटका)
श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर सन 2021-22 गळीत हंगामामध्ये गळीतास आलेल्या ऊसाचा तिसरा हप्ता प्रति मेट्रीक टन 200/- रु. प्रमाणे आज दि. 28/09/2022 पासून बँकेत वर्ग करण्याचे काम चालु झाले आहे. सन 2021-22 गळीत हंगामामध्ये गाळपासाठी आलेल्या ऊसाची बिले आतापर्यंत रक्कम रू. 2300 प्रति मे. टन प्रमाणे अदा झालेली आहेत. तसेच उर्वरित ऊस बिलाची रक्कम दिवाळीपर्यंत ऊस उत्पादकांच्या खात्यावरती वर्ग केली जाणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. मिलिंद कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

सभासद तसेच ऊस उत्पादकांना सन 2021-22 गळीत हंगामातील एकूण एफ.आर.पी. च्या 96% ऊस बिले अदा केली आहेत. तसेच सन 2015-16 गळीत हंगामातील प्रलंबित ऊस बिलाची 10% रक्कम अदा केली आहे. कामगार देणी निधी उपलब्धतेनुसार अदा करण्याचे नियोजन केले आहे. कारखान्याचे चेअरमन आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभावेळी सभासद तसेच ऊस उत्पादकांना दिलेले आश्वासन त्यांनी पूर्ण केले असून सभासद, ऊस उत्पादकांनी कारखाना व्यवस्थापनावर पूर्ण विश्वास ठेवून येणाऱ्या गळीत हंगामामध्ये जास्तीत जास्त ऊस गळीतासाठी देऊन सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी श्री. कुलकर्णी यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
