‘माता सुरक्षित तर, घर सुरक्षित’ ही आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतील योजना घरोघरी पोहोचवा – जिल्हाप्रमुख महेश चिवटे
करमाळा (बारामती झटका)
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून ‘माता सुरक्षित तर, घर सुरक्षित’ या मोहिमे अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व महिलांची मोफत आरोग्य तपासणी मोहीम सुरू केली असून त्याची आज करमाळा तालुक्यात सुरुवात झाली. तालुक्यातील सर्व शासकीय रुग्णालयातून सुरू आहे याचा फायदा सर्वांनी घ्यावा, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी केले.
करमाळ्यातील जिल्हा उप रुग्णालयात या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार समीर माने, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत हिरे, पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, शिवसेना शिंदे गटाचे युवा सेनेचे जिल्हा समन्वयक निखिल प्रमोदभाऊ चांदगुडे, भाजपचे ॲड. प्रियाल अग्रवाल, डॉ. संदेश शहा, डॉ. रोहन पाटील, डॉ. निलेश मोटे, डॉ. अमोल घाडगे, डॉ. चंद्रकांत सारंगकर, डॉ. करंजकर, डॉ. दयानंद शिंदे, डॉ. शेलार, तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल डुकरे, डॉ. महेश भोसले, डॉ. स्मिता बंडगर, डॉ. अस्मिता डिंगी, डॉ. शिंदे, श्रीमती ओंबासे, सिस्टर ढाकणे, सिस्टर शिंदे, सिस्टर खाडे, सिस्टर मांडावे मॅडम, कांबळे मॅडम, दलित सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण भोसले, शिवसेना हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर यांच्या शुभ हस्ते झाले.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख चिवटे पुढे म्हणाले की, राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी या सरकारने पुढाकार घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून नवरात्रीच्या काळात नऊ दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील स्त्रियांच्या आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतली असून यातून निष्पन्न झालेल्या आजारावर मोफत औषधोपचार व ऑपरेशन सर्जरी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. याचा प्रचार व प्रसार महाराष्ट्रातील सर्व शासकीय आरोग्य खात्यामार्फत होत असून करमाळ्यातसुद्धा येत्या पाच दिवसात गावोगावी हे मिळावे घेतले जाणार आहेत.
यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुंबईचे वैद्यकीय सहाय्यक रोहित वायभासे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षापासून मिळणारे अर्थसहाय् योजनेची माहिती दिली. यावेळी बोलताना डॉ. अमोल डुकरे म्हणाले की, शासनाच्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या मोहिमेचा शुभारंभ झाला असून करमाळा तालुक्यातील प्रत्येक महिलेपर्यंत हा आमचा उपक्रम आम्ही पोहोचवणार असून या मोहिमेसाठी सरकारी यंत्रणेसह खाजगी डॉक्टर ही एक सामाजिक भावना म्हणून या पाच दिवसात सर्व स्त्रियांचे मोफत आरोग्याची तपासणी करणार आहेत. यात निदान होणाऱ्या आजार व शस्त्रक्रियांसाठी पुढील मोठ्या रुग्णालयात महिलांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.
यावेळी माता सुरक्षित तर घर सुरक्षित या मोहिमेचा संकल्प मांडून संपूर्ण महाराष्ट्रात शुभारंभ करण्यात आला. आरोग्य मंत्री प्रा. तानाजीराव सावंत यांना लाभ घेतलेल्या महिलांनी धन्यवाद दिले आहेत.
यावेळी करमाळा उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छता व. रूग्णांना देत असलेल्या उपचाराबद्दल उपस्थित नेते मंडळींनी समाधान व्यक्त केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Insightful read! Your analysis is spot-on. For more detailed information, visit: READ MORE. Eager to see what others have to say!