आदिनाथ बचाव समितीमुळे आदिनाथचा १६ लाखाचा फायदा…
करमाळा (बारामती झटका)
आदिनाथच्या संचालक मंडळांनी २९०५ रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे १५,७०० क्विंटल साखर विक्री करून संबंधित व्यापाऱ्याकडून खात्यावर पैसे जमा करून घेतले होते. मात्र, या व्यवहारावर आक्षेप घेऊन आदिनाथ बचाव समितीने री-टेंडर करण्याची मागणी केल्यानंतर जवळपास ११० रुपये प्रतिक्विंटल दराने ही साखर महाग विकल्यामुळे कारखान्याचा १६ लाख रुपयाचा फायदा झाला असल्याचा दावा बचाव समितीने केला आहे.
यावेळी या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याची माहिती आदिनाथच्या काही संचालकांनी बचाव समितीचे निमंत्रक महेश चिवटे व देवानंद बागल यांना दिली.
यानंतर इतर साखरेचे व्यापाऱ्यांकडे भावाची चौकशी केली असता जवळपास ३०५० रुपये प्रतिक्विंटल दराने बाजारात दर असल्याचे निदर्शनास आले. चार वर्षांपूर्वीच्या आदिनाथ जुनी साखर असल्यामुळे हा दर कमी असून नवीन साखरेचा दर ३४०० ते ३५०० आहे.

मात्र चार वर्षांपूर्वीची जुनी साखर सुद्धा ३१०० प्रतिक्विंटल प्रमाणे काही व्यापाऱ्यांनी खरेदी करायची तयारी दर्शवली. तात्काळ आदिनाथ कारखान्यावर एका साखर व्यापाऱ्याने ईमेल करून ही साखर ३१०० रुपये क्विंटल प्रमाणे खरेदी करू, अशी लेखी पत्र दिले.
मात्र एक तासाच्या घडामोडीनंतर या व्यापाऱ्यांनी पुन्हा साखर खरेदी करण्यास नकार दिला. आदिनाथ कारखान्याचा व्यवहार हरिदास डांगे, नारायण पाटील व रश्मी बागल ही तिघेजण मिळून पाहत असल्यामुळे तात्काळ हा विषय महेश चिवटे यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या कानावर घातला.

यानंतर तात्काळ ना. तानाजी सावंत यांनी यासंदर्भात कारखाना प्रशासनाकडून माहिती घेऊन काही संचालकांची बैठक घेतली.
यानंतर पहिल्या व्यापाऱ्याला दिलेले साखरेची टेंडर रद्द करून नवीन वाढीव दराने साखर विका असे आदेश तानाजीराव सावंत यांनी दिल्यानंतर ही साखर प्रतिक्विंटल १०० रुपये जास्त दराने विक्री करण्यात आली. यामुळे १५,७०० क्विंटल साखरी मागे प्रतिक्विंटल १०० प्रमाणे कारखान्याचा १६ लाखाचा फायदा बचाव समितीमुळे झाला असल्याचा दावा निमंत्रक महेश चिवटे यांनी केला आहे.
रमेश कांबळे, उपाध्यक्ष, आदिनाथ सहकारी साखर कारखाना
जास्तीत जास्त दराने साखर विक्री करावी हा आमचा काही संचालकाचा आग्रह होता. मात्र, चेअरमन धनंजय डोंगरे यांनी तात्काळ एक हाती निर्णय घेऊन ही साखर २९०५ रुपये क्विंटल प्रमाणे विकली होती, याला आमचा विरोध होता. आता जास्त दराने साखर विकत आहे आता आम्हाला आनंद आहे.
आदिनाथ कारखान्यातील गोडाऊन मधून चोरीला गेलेल्या मालाच्या प्रकरणी करमाळा पोलिसात गुन्हा दाखल असून याचा तपासू सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपासाची गती व वाढवावी, अशी मागणी बळीराजा संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी केली आहे.

मकाई कारखान्याचे माजी चेअरमन व अध्यानात सहकारी साखर कारखान्याची माजी संचालक खडकी येथील व सध्या पुणे येथे रहिवासी असलेले सुभाष शिंदे यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पुनर्जीवनासाठी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. याबद्दल कारखाना प्रशासन त्यांचे आभारी आहे, असे कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांनी सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng