चांडाळ चौकडीच्या करामती फेम बाळासाहेब उर्फ ह.भ.प. भरत महाराज शिंदे यांचे माळशिरस येथे सुश्राव्य कीर्तन होणार
कै. शामराव भाऊ केरबा टेळे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथील कै. शामराव भाऊ केरबा टेळे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमीत्त चांडाळ चौकडीच्या करामती फेम बाळासाहेब उर्फ ह.भ.प. भरत महाराज शिंदे, बारामती यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन रविवार दि. ९/१०/२०२२ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेमध्ये अकलूज-माळशिरस रोड (देशमुखपट्टा) ६१ फाटा, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे.
तरी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीमती तानुबाई शामराव टेळे, श्री. तात्यासो शामराव टेळे, सौ. रेशमा तात्यासो टेळे, कुमारी जयश्री शामराव टेळे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नजरचुकीने आमंत्रण द्यायचे राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून नातेवाईक व मित्रपरिवार यांनी कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त टेळे, वाघमोडे आणि कोकरे परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng