कण्हेर गावचे प्रगतशील बागायतदार नामदेव माने पाटील यांच्या स्मृती परिवाराने अनोख्या पद्धतीने जपल्या
माळशिरस तालुक्यासह सोलापूर, सातारा, पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात कार्यक्रम संपन्न.
माळशिरस पंचायत समितीचे माजी पंचायत समिती गौतमआबा माने पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांचे ते पिताश्री होते
कण्हेर ( बारामती झटका )
कण्हेर ता. माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार नामदेव श्रीपती माने पाटील यांचे वयाच्या 90 व्या वर्षी अल्पशा आजाराने गुरुवार दि. 06/10/2022 रोजी दुःखद निधन झालेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आठ मुले, सुना, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य गौतमआबा माने व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने यांचे ते वडील होते. त्यांच्यावर राहत्या घराशेजारी माजी आमदार रामहरी रुपनवर यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अग्निसंस्कार करण्यात आलेले होते.
शनिवार दि. 08/10/2022 रोजी सकाळी साडेसात वाजता रक्षा विसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी माने पाटील परिवार यांनी अनोख्या पद्धतीने स्मृती जपलेल्या आहेत. वडिलांची आठवण कायम राहावी, यासाठी आंब्याची पाच झाडे उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते लावून रक्षा इतरत्र फेकून न देता झाडाच्या बुडामध्ये टाकण्यात आलेली आहे. माने पाटील परिवार यांनी अनोख्या पद्धतीने स्मृती जपलेल्या संकल्पनेचे उपस्थित जनसमुदाय यांनी कौतुक केलेले आहे. यावेळी माळशिरस तालुक्यातील ज्येष्ठ नेते गणपत तात्या वाघमोडे, माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्रआबा ठवरे पाटील, माण पंचायत समितीचे माजी सभापती बबनराव विरकर, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रकाशबापू पाटील, धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंतराव सुळ, श्री श्री सद्गुरु साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, आंतरराष्ट्रीय संकुल कुस्ती केंद्र पुणे वस्ताद गोविंदतात्या पवार, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य लक्ष्मणराव पवार, भाजप सोलापूर जिल्हा प्रभारी के. के. पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर महादेवराव देशमुख, संजयअण्णा मोटे, माण पंचायत समितीचे माजी उपसभापती श्रीराम पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर सुळ पाटील, माजी पंचायत समिती सदस्य जयवंततात्या पालवे, बबनबापू पालवे, बाळासाहेब लवटे पाटील, ज्ञानराज उर्फ माऊली पाटील, माण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती युवराज बनगर, राष्ट्रीय समाज पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष मामूशेठ वीरकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मान तालुका उपाध्यक्ष बाळासो काळे, उद्योजक अतुलशेठ बावकर, संतोषआबा वाघमोडे पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजितभैया बोरकर, ॲड. आप्पासाहेब वाघमोडे, म्हाडाचे उपमुख्य अभियंता भीमराव काळे, मांडकीचे डबल सरपंच किरण माने, भांबचे सरपंच पोपटराव सरगर, अहिल्यादेवी सोसायटीचे चेअरमन संदीप पाटील, रवींद्र काळे, प्रवीण काळे, आदी मान्यवरांसह तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, समाजामधील प्रतिष्ठित इंजिनिअर, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदिंसह कण्हेर पंचक्रोशीसह इस्लामपूर, मांडकी, रेडे, जळभावी, गोरडवाडी, भांब, मांडवे, भांबुर्डे, लोणंद, गिरवी, पिंपरी, मेडद आदी गावातील ग्रामस्थ व समस्त कण्हेरकर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng