दि मॉडेल विविधांगी प्रशालेचे मुख्याध्यापक गिरीश ढोक यांना जिल्हास्तरीय “उपक्रमशील आदर्श शिक्षक पुरस्कार”
माळीनगर (बारामती झटका)
येथील दि मॉडेल विविधांगी प्रशाला, माळीनगर या प्रशालेचे मुख्याध्यापक गिरीश तुकाराम ढोक यांना जिल्हास्तरीय “उपक्रमशील आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार” देवून नुकतेच सन्मानित करण्यात आले.
सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सोलापूर यांच्यावतीने जिल्हास्तरीय आदर्श शाळा, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक व गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे शुक्रवार दि. ७ ऑक्टोबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे शिक्षण उपसंचालक विकास गरड, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व जि. प. सदस्य सुभाष माने, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर बाबर, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार, प्रशासनाधिकारी संजय जावीर, सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य राजाभाऊ सरवदे, माळशिरस तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष सुभाष घुले आदी सर्व मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य गिरीश ढोक यांना हा उपक्रमशील आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार, सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले.
प्राचार्य श्री. ढोक यांनी महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीत कार्यकारिणीत व सचिव म्हणून काम केले आहे. अनिसच्या माध्यमातून चमत्कार सादरीकरण, जटा निर्मूलन, प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांसाठी वैज्ञानिक जाणीवा शिबिर तसेच सर्पमित्र म्हणून श्रद्धा का अंधश्रद्धा विषयी जनजागृती ही केली आहे. त्याचबरोबर स्काऊट शिक्षक म्हणून त्यांनी बेसिक, एडव्हेंचर हा कॅम्प करीत, सहा जांबोरी आंतरराष्ट्रीय शिबिर ओरिसा, चेन्नई, रायपूर, हरिद्वार, कलकत्ता, दिल्ली या ठिकाणी कॉन्टिजन लीडर, जिल्हाप्रमुख म्हणून सहभागी झाले होते. प्रशालेमध्ये तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले होते. याच कार्याची दखल घेत श्री. ढोक यांना हा पुरस्कार देण्यात आला.
प्राचार्य गिरीश ढोक यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र गिरमे, चेअरमन नंदकुमार गिरमे, दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे व्हा. चेअरमन प्रकाश गिरमे, सचिव ऍड. सचिन बधे, खजिनदार नितीन इनामके व सर्व संचालक, प्रशालेचे उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, यांनी त्यांचे अभिनंदन केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
I enjoyed the humor in your piece! For further reading, check out: FIND OUT MORE. Let’s discuss!