पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा माळशिरस तालुका दौरा जाहीर.
अकलूज ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे महसूल पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या समवेत माळशिरस तालुका दौरा मंत्री महोदय यांचे खाजगी सचिव विकास पाटील यांनी जाहीर केलेला आहे.
रविवार दि. 16/10/2022 रोजी सकाळी 9 वा. 15 मि. नवीन शासकीय विश्रामगृह, पुणे येथून मोटारीने शिर्के हेलिपॅड मुंडवा, पुणेकडे प्रयाण करतील. 10 वाजता शिर्के हेलिपॅड येथे आगमन व खाजगी हेलिकॅप्टरने श्रीपुर ता. माळशिरस कडे प्रयाण होणार आहे. 10.45 वा. श्रीपुर ता. माळशिरस हेलिपॅड येथे आगमन होणार आहे. 11 वा. श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2022-23 च्या शुभारंभ व इतर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. 12 वा. श्रीपूर येथून मोटारीने बोरगाव येथील राजकुमार पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत.

बोरगाव वरून 12.20 वा. अकलूजकडे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे शिवरत्न निवासस्थानी 12.45 वा. सदिच्छा भेट देणार आहेत. अकलूज येथून 01.30 वा. पानीव येथील डॉ. सुनील पाटील यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत. पानीव येथून 01.45 वाजता अकलूज हेलिपॅड येथे आगमन व खाजगी हेलिकॉप्टरने शिर्के हेलिपॅड पुणे कडे 02.00 वा. प्रयाण करतील. असा दौरा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा जाहीर झालेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
