Uncategorized

सुहास पाटील यांची अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

माढा (बारामती झटका) राजेंद्र गुंड पाटील यांजकडून

माढा तालुक्यातील जामगावचे उपसरपंच व मार्केट कमिटीचे उपसभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुहास पाटील जामगावकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे पत्र परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा चित्रपट निर्माते दिग्दर्शक प्रा. शरद गोरे यांच्या हस्ते देण्यात आले.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष साहित्यिक शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यकारणीच्या बैठकीत सर्वांनुमते ही निवड करण्यात आली आहे. सुहास पाटील यांनी राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रासह पर्यावरण संवर्धनासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या ज्ञानाचा व माहितीचा उपयोग साहित्य परिषदेच्या प्रचार व प्रसारासाठी व्हावा तसेच सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त नामवंत साहित्यिका सुवर्णा पवार यांचे अध्यक्षतेखाली गुरुवार दि‌. 20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या 18 व्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी उपयोग व्हावा या निमित्ताने ही नियुक्ती केली आहे.

नियुक्तीनंतर जिल्हा उपाध्यक्ष सुहास पाटील यांनी सांगितले की, या साहित्य परिषदेच्या माध्यमातून माढा तालुक्यासह जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सेमिनार, काव्य संमेलने, व्याख्याने व चर्चासत्रे तसेच मराठी भाषेच्या विकासासाठी शाळा व महाविद्यालयीन पातळीवर विविध स्पर्धा राबविण्याचा मानस आहे. याकामी संस्थेतील व तालुक्यातील अभ्यासू व जाणकार शिक्षकांना मदतीला घेतले जाणार आहे.

यावेळी कवी रमेश खाडे, प्रदेश संघटक अमोल कुंभार, वरिष्ठ लिपिक शहाजी कदम, चेअरमन अनिलकुमार अनुभुले, कवी फुलचंद नागटिळक, प्रा. पंडितराव लोहकरे, प्रथमेश खळसोडे, चेअरमन रमाकांत कुलकर्णी, गोपीनाथ गवळी, समाधान चव्हाण यांच्यासह परिषदेचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते.

या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन आ. बबनदादा शिंदे, आ. संजयमामा शिंदे, जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे, माढा वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष धनराज शिंदे, माढेश्वरी बँकेचे उपाध्यक्ष अशोकशेठ लुणावत, कृषी पर्यवेक्षक अनिल देशमुख, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक निळकंठ पाटील, अमोलनाना चव्हाण, संदीप पाटील, प्राचार्य सुभाष नागटिळक, माजी उपसभापती उल्हास राऊत, संचालक हनुमंत पाडूळे, सरपंच राजेंद्र खोत, सरपंच तानाजी लांडगे, चेअरमन शिवशंकर गवळी, गणेश काशीद, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष तानाजी देशमुख, सरपंच रमेश भोईटे, उपसरपंच निलेश भोसले, माजी सरपंच शिवाजी भोगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सेवा दलाचे तालुकाध्यक्ष अशोक शिंदे, मुख्याध्यापक अर्जुन ताकभाते, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, शाहीर चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button