समाजभूषण नानासाहेब देशमुख विकास सोसायटीच्या सभासदांना ९ टक्के लाभांश वाटप
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते ता. माळशिरस येथील समाजभूषण नानासाहेब देशमुख विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या सभासदांना सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या शुभहस्ते ९ टक्के लाभांश वाटप करण्यात आला.
यावेळी संस्थेचे मार्गदर्शक बाबाराजे देशमुख म्हणाले कि, समाजभूषण नानासाहेब देशमुख विकास सोसायटीने दोन कोटी कर्जवाटप केले आहे. संस्थेला ॲडिट वर्ग ‘अ’ असुन संस्थेचे चेअरमन, संचालक यांच्या प्रयत्नाने व सभासदांच्या सहकार्याने संस्थेची शंभर टक्के वसुली झाली आहे.

यावेळी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जननायक मामासाहेब पांढरे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, संस्थेचे चेअरमन विलास काळे, व्हाईस चेअरमन धनाजी देशमुख, रेणुका पतसंस्थेचे चेअरमन अर्जुन जठार, बाळासाहेब काळे, महेश शेटे, संपत पांढरे, नारायण बोराटे, हनुमंत जठार, रावसाहेब पांढरे, राहुल काळे, सुनील काळे, धनाजी पांढरे, सोनबा खरात, काशिनाथ सोनवणे, हर हर महादेव पतसंस्थेचे चेअरमन सागर इंगोले, सुभाष इंगोले, मोहन वाघमोडे, सचिव दशरथ साळुंखे, सहाय्यक प्रमोद कुलकर्णी तसेच सर्व संचालक, सभासद उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
