प्रथमेश कन्स्ट्रक्शनचे उद्योजक देविदास शिंदे परिवाराच्यावतीने कामगारांची दिवाळी गोड केली.
अकलूज ( बारामती झटका )
कन्स्ट्रक्शन म्हटले की, कामगार मजूराची कामांवर गरज असते. कामगारांच्या सहकार्यामुळे उद्योग व्यवसाय विकसित होत जातो. मालक दररोज काम केलेल्या मजुरांचा पगार देतात. गोरगरीब ते श्रीमंतांपासून सर्वांना दीपावली सणाचा आनंद असतो. प्रथमेश कन्स्ट्रक्शन अकलूज पानीव गावचे युवा उद्योजक श्री. देविदास शिंदे उर्फ नाना यांनी सतत अकरा वर्ष सर्वसामान्य व गरीब मोलमजुरी करणाऱ्या कामगारांची दिवाळी गोड करण्याची परंपरा जोपासलेली आहे.



प्रथमेश कन्स्ट्रक्शन अकलूज यांच्या माध्यमातून उद्योजक श्री. देविदास शिंदे व पुतण्या तुषार शिंदे यांनी दीपावली सणानिमित्त वीस कामगारांना संपूर्ण कपड्याचा आहेर घेऊन सोबत एक तेल डबा, पाच किलो साखर, पाच किलो डाळ, पाच किलो रवा व इतर दीपावलीचे साहित्य देऊन दैनंदिन कामावर येताना जेवण आणण्याकरता तीनथाळी जेवणाचा डबा दिलेला आहे.
सदरचा कार्यक्रम इंजिनिअर शेंडगे साहेब, शिरीष जोशी, चार्टर्ड अकाउंटंट नितीन कुदळे, बोरावके साहेब, बंडू राऊत, निळकंठ पिसे, नंदकुमार भैलूमे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी खुडूसचे बागायतदार सुखदेव बोरकर, माजी सरपंच डॉ. रमेश माने, धुळदेव शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.



कॉन्ट्रॅक्टर देविदास शिंदे, तुषार शिंदे, प्रथमेश देविदास शिंदे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे फेटे बांधून स्वागत केले. यावेळी उपस्थित सर्व कामगारांना कपडे व साहित्याचे वाटप करण्यात आले. कामगारांच्या चेहऱ्यावर आनंद तरळत होता. यावेळी उपस्थितांनी स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
