प्रगतशील बागायतदार नंदकुमार माने पाटील यांच्या माणुसकीवर ऊसतोड मजूर भारावून गेले.
अकलूज ( बारामती झटका )
बागेवाडी अकलूज येथील प्रगतशील बागायतदार नंदकुमार व्यंकटराव माने पाटील यांच्या आपलेपणा व माणुसकीवर ऊसतोड मजूर भारावून गेलेले आहेत.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना लि. शंकरनगर, अकलूज या कारखान्याचे ऊसतोड मजूर यांची ऊस तोडणी सुरू आहे.
प्रगतशील बागायतदार नंदकुमार माने पाटील यांच्या शेतातील उसाची तोड सुरू आहे. सध्या दिवाळीचा मोठा सण असताना सुद्धा ऊसतोड मजूर आपली घरेदारे सोडून कारखान्याकडे ऊस तोडणीसाठी येत असतात. कारखाना सीजन बंद झाल्यापासून सुरू होईपर्यंत ऊसतोड मजूर तोडणीसाठी पैशाची उचल घेत असतात आणि उचलीचे पैसे फेडण्याकरता ऐन सणासुदीचे सुद्धा घरेदारे सोडून लेकराबाळांसह कारखान्यावर ऊस तोडणी करता जावे लागते.
नंदकुमार माने पाटील यांच्या घराण्यामध्ये मने जपणं, अडचणीत मदत करणे ही परंपरा आहे. राजकारण व समाजकारण यामधून जनतेची सेवा करण्याचे माने पाटील घराण्याचे सुरू आहे. संग्रामनगर ग्रामपंचायतच्या सरपंच पदी सौ. राजवर्धिनी श्रीराज माने पाटील व उपसरपंच पदी श्रीराज नंदकुमार माने पाटील यांनी गावातील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या वेळोवेळी अडचणी सोडविलेल्या आहेत.
नंदकुमार माने पाटील उर्फ आप्पा यांनी ऊसतोड मजुरांची दिवाळी गोड केलेली असल्याने कामगारांच्या परिवारातील सदस्यांच्या चेहऱ्यावर आनंद तरळत होता. अनेकांकडे धनदौलत, पैसाअडका आहे, मात्र सहकार्य व मदत करण्याची दानत असावी लागते. खऱ्या अर्थाने प्रगतशील बागायतदार यांनी आमची कदर केली. त्यामुळे माने पाटील घराण्यामध्ये माणुसकीचे दर्शन पाहावयास मिळालेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng