शंकरराव मोहिते पाटील चॅरिटेबल ट्रस्टची जमीन विक्री लिलावाला मुदतवाढ मिळाली.
यशवंतनगर देतील हद्दीतील अकलूज लगत असणाऱ्या नऊ एकर जमिनीची मूळ किंमत चार कोटी मुदत वाढीमुळे वीस कोटीवर जाण्याची शक्यता.
पुणे ( बारामती झटका )
शंकरराव मोहिते पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्ट ट्रस्ट यशवंतनगर तालुका माळशिरस या ट्रस्टच्या सुमारे नऊ एकर जमिनीचा जाहीर विक्री लिलाव सहाय्यक धर्मदाय आयुक्त पुणे- 2 या ठिकाणी 28/ 10 /20 22 रोजी चार कोटी दहा लाख रुपयासाठी जाहीर लिलाव विक्री होणार होती सदरची जमीन विक्री लिलाव मुदतवाढ मिळालेली आहे पुढील तारीख 15/11/2022 रोजी दुपारी 02 वाजून 30 मिनिटे या वेळेमध्ये कार्यालयांमध्येच बंद पाकिटातील अर्ज व निविदा ओपन करण्याचे ठरलेले आहे सदरच्या जागेसाठी सात कंपन्या व व्यक्ती यांनी सहभाग घेतलेला आहे . यशवंतनगर हद्दीतील अकलूज शेजारी असणारे सुमारे नऊ एकर जमिनीची मूळ किंमत जरी चार कोटी असली तरी जाहीर लिलावाच्या बोलीमध्ये वीस कोटीवर जाण्याची शक्यता सहभाग घेतलेल्या कंपन्या व व्यक्तींच्या मधून बोलले जात आहे.
शंकरराव मोहिते पाटील चॅरिटेबल हाॅस्पिटल ट्रस्टच्या जमीन विक्री लिलावत सहभाग कांगारू शटर्स प्रायव्हेट लिमिटेड. अशोका स्थापत्य प्रायव्हेट लिमिटेड, पांडुरंग तुळशीराम वाघमोडे, ए एस इंटरप्राईजेस, युनायटेड डेव्हलपमेंट सुनील कांबळे, प्रभाकर इंगळे सर देशमुख, सुनील कांबळे, अशा सात कंपन्या व व्यक्तिगत लोकांनी सहभाग नोंदविलेला आहे. माळशिरस तालुक्यात विझोरी, पिसेवाडी ,नातेपुते, लाखेवाडी, इंदापूर, खुडूस ,निमगाव अशा जमिनीच्या वेळी मर्जीतील लोकांना निलावाच्या सहभागातून बाजूला करण्यामध्ये यशस्वी झालेले होते सध्या माळशिरस तालुक्यामधील विशेष म्हणजे यशवंत नगर येथे रहिवासी असणाऱ्या लोकांनी यामध्ये सहभाग घेतलेला असल्याने जमीन विक्री लिलावात चुरस निर्माण होणार आहे काहीतरी प्रयत्न करण्याकरता जमिनी विक्रीचा लिलाव पुढील तारखेला गेला आहे की काय अशीही शंका उपस्थित केली जात आहे. मात्र जमिनीच्या जाहीर लिलाव विक्री मध्ये सहभागी झालेल्या कंपन्या व व्यक्ती माळशिरस तालुक्यातीलच आहेत. चार कोटीची जमीन वीस कोटी जरी बोलीमध्ये बोलण्याची वेळ आली तरीसुद्धा मागे हटणार नाही अशी भूमिका घेतलेली असल्याने पंधरा तारखेकडे माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng