Uncategorized

सदाशिवनगरचा शेतकरी पुत्र जागतीक शास्त्रज्ञ यादीत समाविष्ट

अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठ जाहीर केली शास्त्रज्ञांची यादी

माळशिरस (बारामती झटका)

जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची सन 2022 ची नवीन यादी नुकतीच अमेरिका येथील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने “स्कॉपस” डेटाबेसच्या आधारे जाहीर केली आहे. तसेच “ए.डी. सायंटिफिक इंडेक्स” या संस्थेने ही तयार केलेली जागतिक दर्जाची नामांकित शास्त्रज्ञांची नवीन यादी जाहीर केली आहे. या दोन्ही यादीमध्ये सदाशिवनगर, ता. माळशिरस (मुळगाव) येथील डॉ. रणजीत गजानन गुरव यांनी स्थान प्राप्त केले आहे.

डॉ. गुरव हे सध्या अमेरिका येथील टेक्सास स्टेट विद्यापीठ येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी जैवतंत्रज्ञान, पर्यावरण शास्त्र, व सक्षम आणि धोरणात्मक तंत्रज्ञान या क्षेत्रांमधील आपल्या कामगिरीच्या आधारे स्थान मिळवले आहे. डॉ. गुरव हे मूळचे सदाशिवनगर येथील एका शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांनी आपली एम.एस.सी. व पीएच.डी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील जैवतंत्रज्ञान विभागातून केली आहे. पुढे चीन येथील नामांकित अशा नानकाई विद्यापीठ येथून एन्व्हायरमेंटल इंजीनियरिंग या विषयामधून पोस्ट डॉक्टरेट केली. याशिवाय त्यांनी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागामार्फत देण्यात येणारा तरुण शास्त्रज्ञ म्हणून संशोधन प्रकल्प ही मिळवला आहे. डॉ. गुरव बायोटेक रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया तसेच असोसिएशन ऑफ मायक्रोबायोलॉजीस्ट ऑफ इंडिया या संस्थेचे सदस्य आहेत. त्यांनी दक्षिण कोरिया येथील कोंकुक विद्यापीठ येथे बायलॉजिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये शास्त्रज्ञ म्हणूनही काम केले.

आतापर्यंतचे डॉ. रणजीत गुरव यांनी सूक्ष्मजीव इंधन व वीज निर्मिती, बायोप्लास्टिक उत्पादन व विघटन, बायोकेमिकल उत्पादन, बायोचार, आण्विक जीवशास्त्र, अँटिबायोटिक प्रतिकार, सांडपाणी प्रक्रिया, पोल्ट्री कॅरेटिन विघटन व जैविक खत निर्मिती इत्यादी विषयांमध्ये संशोधन केले आहे. यांनी आजपर्यंत 100 हून अधिक जागतिक दर्जाचे संशोधन पेपर प्रसिद्ध केले आहेत, तसेच दोन पेटंटही त्यांच्या नावे आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button
marsbahis hacklink market casibom