पत्रकार संघाला प्रगतीपथावर नेण्याचे काम करणार – अध्यक्ष संजय देशमुख
माळशिरस (बारामती झटका)
सामाजिक कार्यासाठी पत्रकारांना आपल्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या माळशिरस तालुका पत्रकार संघाला प्रगतीपथावर नेण्याचे काम केले जाईल, असे आश्वासन माळशिरस तालुका पत्रकार संघाचे नुतन अध्यक्ष संजय देशमुख यांनी दिले. रविवार दि. ३० रोजी अकलूज येथे माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष निनाद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नुतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्काराला उत्तर देताना संजय देशमुख बोलत होते.
यावेळी संघाचे मार्गदर्शक विनोद बाबर, कार्याध्यक्ष एल. डी. वाघमोडे, कायदेशीर सल्लागार अॅड. जी. पी. कदम, संघाचे सदस्य मनोज राऊत, उदय कदम, बंडू पालवे, संजय हुलगे, विजयकुमार देशमुख, दिनेश माने देशमुख, तानाजी वाघमोडे, संजय पवार, शाहरूख मुलाणी, नितीन मगर, स्वप्निलकुमार राऊत, ओंकार आडत, लक्ष्मण राऊत आदी उपस्थित होते.


माळशिरस तालुका पत्रकार संघाची धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणी असलेला तालुक्यातील हा एक पत्रकार संघ असून संघाच्या वतीने वर्षभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. आतापर्यंत संघाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, सामाजिक संस्थांना देणगी, मृत पत्रकारांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करणे अशी अनेक कामे करण्यात आली. याबरोबरच कोरोना काळातील आपत्कालीन परिस्थिती असो वा ऊसदरासाठी चिघळलेले आंदोलन असो किंवा तालुक्यातील एखाद्या खेळाडूने राज्य स्तरावर मिळवलेले यश असो, अशावेळी डॉ. एम. के. इनामदार, माजी खासदार राजू शेट्टी, आ. रामभाऊ सातपुते, उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांचे प्रगल्भ विचार जनतेसमोर मांडण्याचे काम करण्यात आले.
सदर निवडीनंतर संघाच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सोमनाथ कर्णवर पाटील (सहा. पोलीस निरीक्षक, ठाणे) यांचेहस्ते करण्यात आला.
यावेळी तालुक्यातील स्पर्धा परिक्षेतील उमेदवारांसाठी काम करणाऱ्या तालुका अधिकारी प्रतिष्ठानला माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या वतीने देणगी देण्यात आली. या देणगीचा धनादेश संघाचे माजी अध्यक्ष निनाद पाटील यांच्या हस्ते सोमनाथ कर्णवर पाटील यांचेकडे देण्यात आला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng